काय सांगताय! उंटाच्या तोंडात सोडला जातो जिवंत कोब्रा, कारण ऐकून व्हाल थक्क!

उंटाच्या तोंडात का सोडला जातो विषारी किंग कोब्रा?  

Updated: Oct 13, 2022, 12:48 AM IST
काय सांगताय! उंटाच्या तोंडात सोडला जातो जिवंत कोब्रा, कारण ऐकून व्हाल थक्क!  title=

Camel Eats King Cobra And Python : आपल्याला उंटाबद्दल बेसिक माहिती असते. म्हणजे फक्त ते राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या पोटात असलेल्या पिशवीमध्ये एकाचवेळी जास्त पाण्याचा साठा करून ठेवू शकतात. उंट 7 फूट लांब असतात आणि 100-150 लिटर पाणी एकाच वेळी पिण्याची क्षमता त्यांच्यात असते. (camel eats king cobra python snake secret reason shocking to know wildlife marathi Viral News)

कुठेतरी पर्यटनाला गेल्यावर त्याची एक सवारी बस इतपत उंटाबद्दल आपल्याला माहिती असते. मात्र तुम्हाला माहितीये का उंटाच्या नाकामध्ये विषारी किंग कोब्रा या जातीचा साप सोडला जातो. यामागे एक मोठं रहस्य आहे, नेमकं काय ते जाणून घ्या. 

उंटाला एक असा आजार होतो त्यावेळी हा भलामोठा प्राणी खाणं पिणं बंद करतो. काही दिवसांनी त्याचं शरीरही आखडायला सुरू होते. त्यासोबतच ताप येणे, डोळ्यांत अश्रू येणे, अशक्तपणा, अंग फुगणे, ऊर्जाही कमी होते.  हा आजार बरा करण्यासाठी थक्क करणारा जालीम उपाय आहे. Hyam असं आजाराचं नाव असून वेळेवर उपचार न केल्यास उंटाचा मृत्यूही होऊ शकतो.

उंटाचा आजार बरा करण्यासाठी उंटाच्या तोंडात किंग कोब्रा किंवा पायथनसारखा विषारी साप सोडल्याने उंट बरा होतो. साप सोडल्यानंतर उंटाला भरपूर पाणी पाजावं लागते त्यामुळे साप आत जातो. त्यामुळे सापाचे विष उंटाच्या शरीरात पसरते, असे सांगितले जाते. हळूहळू प्रभाव कमी होत असल्याने उंट बरा होतो.

तज्ञ काय म्हणतात?
उंटाच्या या आश्चर्यकारक आजाराबाबत शास्त्रज्ञ फारशी माहिती गोळा करू शकले नाहीत, त्यामुळे उंटाच्या मालकांना अशा प्रकारे उपचार करावे लागतात. शास्त्रज्ञ या उपचाराची पुष्टी करत नाहीत. प्राण्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते हा रोग कीटक चावल्यामुळे होऊ शकतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.