Trending News In Marathi: चोरी करण्यासाठी चोर घरात शिरला. घरातील सदस्य झोपण्याची वाट पाहत बसला मात्र, तितक्यात असं काही झालं की चोराला स्वतःलाच झोप लागली. कुटुंबीयांना जाग आल्यानंतर चोराला बघून त्यांच्यापायाखालची जमिनच हादरली. चोराला गाफिल ठेवून त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनेचे गांभीर्य ओखळून तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चोराला अटक केली. पण नेमकं असं काय झालं की चोराला घरात येताच झोप लागली. जाणून घेऊया.
चीनच्या युन्नान प्रांतातील ही घटना आहे. साउथ चायनायेथील मॉर्निंग पोस्ट (एससीएमपी)ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पश्चिम चीनमधील हा प्रकार आहे. रिपोर्टनुसार, चोराच्या आळशी स्वभावाने तो पोलिसांच्या जाळ्यात फसला. चोरी करण्यासाठी तो एका घरात शिरला. मात्र, घरातील सदस्य झोपण्याची वाट पाहत तो एका ठिकाणी लपून बसला. त्याचवेळी त्याला सिगारेट पिण्याची हुक्की आली. सिगारेट पिवून झाल्यानंतर त्याला झोप अनावर झाली आणि तो तिथेच झोपून गेला.
रिपोर्ट्सनुसार, मध्यरात्री अचानक घरमालकाच्या पत्नीला जोरजोरात घोरण्याचा आवाजाने जाग आली. आधी तिला वाटले की शेजारच्या घरातून आवाज येत असेल. मात्र, जेव्हा मुलाचे दूध संपल्यानंतर दुधाची बॉटल भरण्यासाठी ती किचनमध्ये गेली तेव्हा हा आवाज घरातूनच येत असल्याचे लक्षात आले. तिने दुसऱ्या खोलीत जावून पाहिले तेव्हा फरशीवर एक व्यक्ती झोपला असल्याचे लक्षात आले.
घरात दुसऱ्या व्यक्तीला पाहून ती घाबरलीच तिने लगेचच तिच्या पतीला उठवले आणि पोलिसांना फोन करण्यास सांगितले. पोलिसही लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चोराला अटक केली. चोराचे नाव यांग असं सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर ही घटना चांगलीच चर्चेत आले आहे. चोराचा हा किस्सा व्हायरल झाला आहे. चोराच्या आळशी स्वभावाची सोशल मीडियावर खूपच खिल्ली उडवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅंग असं घरमालकाचे नाव आहे. त्यांनी माहितीदिल्यानंतर लगेचच आम्ही चोराला ताब्यात घेतलं आहे. या चोराचा आधीपासून क्रिमिनल रेकॉर्ड आहे. 2022मध्येही तो चोरीच्या आरोपाखाली जेलमध्ये होता. मात्र सप्टेंबरमध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. मात्र, तुरुंगातून सुटका होताच त्याने पुन्हा एकदा तोच चोरीचा मार्ग निवडला. मात्र, त्याने चोरी सुरू केल्यानंतर तो लगेचच पकडला गेला. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.