27 वर्षात एकही सुट्टी नाही, Burger King च्या कर्मचाऱ्याला आता मिळाले कोटी रुपये; पण...

केविन 54 वर्षाचा आहे, जो बर्गर किंगमध्ये कॅशियर म्हणून काम करत आहे.

Updated: Jul 4, 2022, 03:55 PM IST
27 वर्षात एकही सुट्टी नाही, Burger King च्या कर्मचाऱ्याला आता मिळाले कोटी रुपये; पण... title=

मुंबई : आपण कुठे ही कामाला लागलो असलो, तरी आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे असे म्हणतात. ज्याचे फळ आपल्याला कंपनी नेहमी देते. परंतु एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, तुमचा विश्वासच बसणार नाही. अमेरिकेतील लास वेगासमधील एका कर्मचाऱ्याने गेल्या 27 वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही. बर्गर किंग फूड कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला इतक्या वर्षांनंतर एवढी मोठी भेट मिळाली आहे, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. आता तो कर्मचारी सोशल मीडियावर रातोरात स्टार वर्कर झाला आहे. रजा न घेतल्याने त्याला व्यवस्थापनाकडून हंबल गुडी बॅग मिळाली.

अमेरिकेतील लास वेगासमधील बर्गर किंगच्या एका निष्ठावान कर्मचाऱ्याने 27 वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतली नाही. त्याच्या व्यवस्थापनांकडून गुडी बॅग मिळाल्यानंतर तो एका रात्रीत व्हायरल झाला.

केविन 54 वर्षाचा आहे, जो बर्गर किंगमध्ये कॅशियर म्हणून काम करत आहे आणि 1995 पासून चेनच्या मॅककरन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी स्वयंपाक करत आहे.

त्याचा 27 वा वर्धापनदिन आला आणि त्याच्या मालकांनी त्याला चित्रपटाची तिकिटे, स्टारबक्स कप, कँडी आणि चॉकलेटने भरलेले बॅकपॅक दिले.

या व्यक्तीचा भेटवस्तू स्वीकारताना आणि सहकर्मचाऱ्यांचे आभार मानतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतु काही लोकांचं यावर असं म्हणणं आहे की, इतकी वर्ष एकनिठ राहिल्यानंतर तुम्हाला साधं 'धन्यवाद' मिळाला. हे बरोबर नाही.

त्यानंतर या व्यक्तीच्या मुलींनी त्याच्यासाठी GoFundMe पेज बनवलं, ज्यावर लोकांनी पैसे दान करण्यासाठी सुरुवात केली. त्यानंतर आता सुमारे  300,000 डॉलर (रु. 2.36 कोटींहून अधिक) देणग्या मिळाल्या आहेत आणि ही संख्या अजूनही वाढत आहे.

केविन फोर्डची मुलगी सेरीना हिने निधी गोळा करणाऱ्यावर एक संदेश लिहिला: 'तिने लिहिले व्हिडीओतील व्यक्ती माझे वडील आहेत. त्याने 27 वर्षे त्याने नोकरी केली. त्याने कधीही कामाचा एकही दिवस चुकवला नाही. 27 वर्षांपूर्वी माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची कस्टडी मिळाल्यानंतर त्यांनी एकट्याने आम्हाला वडील म्हणून वाढवलं. नंतर त्यांनी दुसरं लग्न केलं आणि आमचं कुटुंब मोठं झालं. परंतु कुटुंबासाठी ते काम करत राहिले आणि त्यांनी खूप मेहनत केली आहे.