Video : 300 प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली अन्...'टायटॅनिक' सारखं दृश्य कॅमेऱ्यात कैद

Viral Video : 300 हून अधिक लोकांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 6, 2024, 11:20 AM IST
Video : 300 प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली अन्...'टायटॅनिक' सारखं दृश्य कॅमेऱ्यात कैद title=
Boat With 300 Passengers Sinks In River Niger Boat Capsizes In Nigeria viral video

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 300 प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली अन् एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. हा व्हिडीओ गोव्यातील (Goa Viral Video Fact Check) असल्याचा नेटकऱ्यांचा दावा आहे. पण हा व्हिडीओ गोव्यातील नसून मध्य नायजेरियातील नायजर राज्यातील असल्याचा समोर आलंय. या राज्यातील एका नदीत 300 प्रवाशांनी भरलेली अचानक उलटली आणि त्यात 78 जणांना जलसमाधी मिळालीय.सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राज्य व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख अब्दुल्लाही बाबा-अरह यांनी सांगितलं की, शनिवारी आणखी 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. ही बोट इस्लामिक उत्सवातून 300 हून अधिक लोकांना परत आणत होती. मात्र त्यानंतर अचानक ती नदीत उलटली आणि त्यातून प्रवास करणारे प्रवासी पाण्यात बुडाले. 

150 जणांची सुटका 

नायजेरियाचे अध्यक्ष बोला टिनुबू यांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, 300 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटल्यानंतर किमान 78 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा नायजर नदीत एक बोट उलटली. मोकवा स्थानिक शासकीय क्षेत्रातील जेब्बा धरणाजवळ हा अपघात झाला. 300 पैकी सुमारे 150 लोक वाचले. 78 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांनी यापूर्वी एका निवेदनात म्हटंलय की, अपघात झाला तेव्हा पीडित धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहून परतत होते. त्यांनी सांगितलं की, बोटीत बहुतांश महिला आणि मुलं होती. अपघाताचे नेमकं कारण अद्याप तपासात आहे. बाबा-अरह यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ 

त्याच वेळी, राष्ट्रपतींनी राष्ट्रीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाला (NIWA) नायजर आणि संपूर्ण देशात बोट अपघातांची चौकशी करण्याचे निर्देश दिलं. तसंच अशा घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी करण्याचे आदेश देण्यात आलंय नायजेरियन राष्ट्रपतींनी NIWA ला अंतर्देशीय पाण्याच्या देखरेखीची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश दिले जेणेकरून 'जनतेची सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि रात्रीच्या प्रवासावरील बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर खटला चालवा.'