मुंबई : अनेकदा ब्लूटूथचा वापर करत असताना तुम्हाला हा प्रश्न पडला असेलच की, याच्या नावामागची गोष्ट काय आहे? ब्लूटूथ म्हणजे निळा दात असा तर याचा अर्थ होत नाही ना? ब्लूटूथच्या मार्फत आपण कोणत्याही तारेविना फाइल ट्रान्सफर कर शकतो. किंवा वायरलेस टेक्नॉलॉजीच्या मार्फत आपले फोन ईअरफोनला कनेक्ट करतात. यामुळे तुम्ही कोणत्याही अचडणीशिवाय गाणी अथवा फोन उचलू शकतो. अशावेळी जाणून घेऊया ब्लूट्यूथ या शब्दामागची रंजक कहाणी...
ब्लूटूथचे नाव कोणत्याही तंत्रज्ञानाशी संबंधित नसून एका राजाच्या नावावर आहे. त्याचबरोबर अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की ब्लूटूथच्या नावामागे निळे दात देखील जोडले गेले आहेत.
ब्लूटूथच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ब्लूटूथचे नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजाच्या नावावर आहे. त्या राजाचे पूर्ण नाव हॅराल्ड ब्लूटूथ गोर्मसन होते. तो दोन गोष्टींसाठी ओळखला जात होता, 958 मध्ये डेन्मार्क आणि नॉर्वेचे एकत्रीकरण आणि दुसरे म्हणजे त्याचा मृत दात ज्याचा रंग गडद निळा/राखाडी होता. यानंतर त्याला ब्लूटूथ हे टोपणनाव मिळाले.
या तंत्रज्ञानाला राजानेच नाव दिले. ब्लूटूथचे मालक जाप हार्टसेन हे एरिक्सन कंपनीत रेडिओ सिस्टम म्हणून काम करायचे. एरिक्सनबरोबरच नोकिया, इंटेलसारख्या कंपन्याही त्यावर काम करत होत्या. अशा अनेक कंपन्यांना मिळून एक फॉर्मेशन तयार करण्यात आले ज्याला SIG (स्पेशल इंटरेस्ट ग्रुप) असे नाव देण्यात आले.
अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की ब्लूटूथच्या मालकाने या तंत्रज्ञानाचे नाव त्या राजाच्या नावावर का ठेवले? तर याचे उत्तर असे की ब्लूटूथ इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जोडण्याचे काम करते, त्याच प्रकारे किंग हेराल्ड ब्लूटूथने राज्यांना जोडले. यामुळे ब्लूटूथ तयार करणाऱ्या टीमचे सदस्य जिम कार्डेक यांनी त्या तंत्रज्ञानासाठी ब्लूटूथचे नाव सुचवले. जे सर्वांना आवडले, त्यानंतर त्या तंत्रज्ञानाचे नाव ब्लूटूथ ठेवण्यात आले.