आपल्या आनंदाला प्राधान्य देत केलेली 'ती' कृती पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक; 8.4 मिलियन लोकांनी पाहिला VIDEO

Viral Blad Man Video: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओ हा जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी त्याच्या डोक्यावर एकही केस नाही तरीही एक इसम हा बसमध्ये बसून केस विंचरायची कृती करताना दिसला. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. 

Updated: Dec 2, 2023, 09:39 PM IST
आपल्या आनंदाला प्राधान्य देत केलेली 'ती' कृती पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक; 8.4 मिलियन लोकांनी पाहिला VIDEO  title=
blad man combs hair video viral on twitter

Viral Blad Man Video: आपलं सर्वांनाचे आयुष्य हे वेगळे आहे. त्यातून लोकं काय म्हणतील यांचा विचार जे करत नाहीत ते फारच मुक्तपणे जगतात असंही आपण म्हणतो. प्रत्येकाला सुख, दु:ख ही वाटून दिली आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. हा फक्त 12 सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यातून या व्हिडीओला आत्तापर्यंत 8.4 मिलियन व्ह्यूज आले आहेत. सध्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यावेळी त्यानं इतरांचा फारसा विचार न करता आपल्याला आनंदाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे विशेष करून त्या माणसाचे फार कौतुक होताना दिसते आहे. 

सध्या समोर आलेल्या व्हिडीओतून तुम्ही पाहू शकता की, एक इसम हा बसमध्ये बसलेला आहे. ज्याची डोक्यावर टक्कल आहे परंतु अशाप्रकारे केस विंचरतानाची नक्कल करतो आहे की जसे की त्याच्या डोक्यावर भरपूर केस आहेत. सध्या त्याच्या या कृतीकडे पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत तर काहींनी त्याला ट्रोलही केले आहे.

अनेकांना हा व्हिडीओ पाहून हशा फूटला आहे तर अनेक जण इमोशनलही झाले आहेत. या इसमाला माहिती आहे की त्याच्या डोक्यावर एकही केस नाही तरीही तो ही कृती इतक्या सहजतेने करतो आहे की काही विचारू नका. सध्या एका दुसऱ्या बसमधील प्रवाशानं हा व्हिडीओ शूट करून तो व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ परदेशातला आहे. 

हेही वाचा : सहकलाकारापासून जोडीदारापर्यंत; राणादा-पाठकबाईच्या लग्नाला 365 दिवस पूर्ण, विशेष पोस्ट पाहिली का?

Figen या X युझरनं (पुर्वीचे ट्विटर) नं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी हा व्हिडीओ 8.4 मिलियन युझरनं हा व्हिडीओ पाहिला आहे. एकानं युझरनं लिहिलंय की, जुनी सवय कधी जात नाही. तर एकानं लिहिलंय की, तो ती फिलिंग एन्जॉय करतो आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओखाली नानाविध कमेंट्सही केल्या आहेत.