Black Moon: 2024 वर्षातील शेवटची अद्भूत घटना; आकाशात दिसणार काळा चंद्र; पाहण्याची संधी अजिबात सोडू नका

Black Moon: वर्षाच्या शेवटी आकाशात काळा चंद्र दिसणार आहे, जाणून घेऊया ही खगोलीय घटना नेमकी कधी घडणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 30, 2024, 05:54 PM IST
Black Moon: 2024 वर्षातील शेवटची अद्भूत घटना; आकाशात दिसणार काळा चंद्र; पाहण्याची संधी अजिबात सोडू नका   title=

Black Moon 2024: आकाशात चंद्र आपण नेहमीच पाहतो. काळ्या आकाशात लख्ख चमकणारा चंद्र सर्वांनाच आकर्षित करतो. ब्लू मून, रेड मून, पिंक मून अशा विविध रंग छटांचे चंद्र आपण पाहिले आहेत. पण, आता आकाशात ब्लॅक मून अर्थात काळा चंद्र दिसणार आहे.  2024 वर्षातील ही शेवटची अद्भूत खगोलीय  घटना आहे. जाणून घेऊया कधी दिसणार आहे हा ब्लॅक मून. 

ब्रम्हांड अनेक रहस्यांनी भरलेले आहे. ब्रम्हांडात अनेक खगोलीय घटना घटना घडत असतात. अशीच एक अद्धभूत घटना अवकाशात घडणार आहे. यूएसमध्ये 30 डिसेंबर रोजी  तर, युरोप, आफ्रिका आणि आशियातील लोकांना 31 डिसेंबरला हा   ब्लॅक मून पाहता येणार आहे.

ब्लॅक मून म्हणजे काय?

ब्लॅक मूनची व्याख्या ब्लू मून सारखीच आहे. ब्लू मून हा पौर्णिमेच्या वेळेस दिसतो. तर ब्लॅक मून अमावस्येशी संबंधित आहे. भारतीय दिनदर्शिकेनुसार अमावस्येची रात्र शुक्ल पक्ष प्रतिपदेची रात्र असते याला नवचंद्र असेही म्हणतात. कॅलेंडरनुसार एका ऋतूत चार अमावस्या असतील तर तिसऱ्या अमावास्येला ब्लॅक मून म्हणतात. म्हणजे महिन्यातील दुसऱ्या अमावास्येला कृष्णचंद्र असेही म्हणतात. ब्लॅक मून प्रत्यक्षात फार क्वचितच दिसतो. अशी स्थिती दर 29 महिन्यांनी एकदाच येते. तर, हंगामी दर 33 महिन्यांनी एकदाच येते.

खरचं आकाशात काळा चंद्र दिसतो का?

अमावस्येच्या रात्री चंद्र दिसत नाही कारण त्या रात्री चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि त्यामुळे चंद्राचा चमकणारा भाग आपण पाहू शकत नाही. अमावस्येच्या रात्री इतर ग्रह आणि तारे अगदी ठळकपणे दिसतात. तर, चंद्राची फक्त काळी छटा पहायला मिळते.