Mukesh Ambani New Tenant: मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि जगातील निवडक अब्जाधीशांमध्ये त्यांची गणना केली जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांचा भाडेकरू त्यांच्यापेक्षाही श्रीमंत आहे. हा भाडेकरू दरमहा कोट्यवधी रुपये भाडे देतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही भाडे देणारी व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीचं नाव आहे बर्नार्ड अरनॉल्ट आणि संपत्तीच्याबाबतीत त्यांनी मुकेश अंबानींना मागे टाकलं आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, बर्नार्ड अरनॉल्ट आणि त्यांचे कुटुंबियांचं एकूण नेटवर्थ 176 अरब डॉलर आणि जगातील पाचवे अरबपती आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे 90.6 अरब डॉलर संपत्ती आहे. ते जगातील अब्जोधिशांच्या यादीत 17 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच बर्नार्ड अरनॉल्टजवळ मुकेश अंबानी यांच्याहून 86 अरब डॉलर सर्वात जास्त संपत्ती आहे. भारताचे दुसरे अरबपती गौतम अदानी यांची संपत्ती 78.7 बिलियन डॉलर आहे. म्हणजे अंबानी आणि अदानी दोघेही जवळपास $169 अब्ज संपत्तीचे मालक आहेत. पण या दोघांच्या संपत्तीपेक्षा अर्नॉल्टकडे जास्त पैसा आहे. अरनॉल्टने अंबानींकडून काय भाडेतत्त्वावर घेतले आहे?
LVMH Moët Hennessy Louis Vuitton (LVMH) सीईओ आणि अध्यक्ष बर्नार्ड अर्नॉल्ट यांचा व्यवसाय लक्झरी वस्तूंवर आधारित आहे. त्यांच्या व्यवसायात जगभरातील अनेक आयकॉनिक ब्रँडचा समावेश आहे. LVMH ही एक प्रसिद्ध फ्रेंच कंपनी आहे, जी अतिशय महागड्या आणि लक्झरी वस्तूंचे उत्पादन करते. जसे की लुई व्हिटॉन पिशव्या, टिफनी दागिने, डायर कपडे आणि बल्गेरी घड्याळे इ. हे सर्व खूप प्रसिद्ध आणि महाग ब्रँड आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की बर्नार्ड अर्नॉल्ट हे मुकेश अंबानींचे थेट भाडेकरू नाहीत.
यावर तुम्ही विचाराल की मग अरनॉल्ट अंबानीचा भाडेकरू कसा बनला? मुकेश अंबानींनी विकसित केलेल्या Jio World Plaza या आलिशान शॉपिंग मॉलमध्ये बर्नार्ड अर्नॉल्टच्या ब्रँडचे शोरूम आहेत. जिओ वर्ल्ड प्लाझा बांद्रा कुर्ली कॉम्प्लेक्स बीकेसीमध्ये आहे. मुंबईतील सर्वात महागड्या भागांपैकी एक. या मॉलमध्ये जगातील सर्वात महागड्या आणि सर्वोत्तम वस्तूंची विक्री करणारे अनेक लक्झरी शोरूम आहेत.