Berlin Topless Swimmng: बर्लिन (Berlin) देशात आता सार्वजनिक पूलमध्ये (Public Pool) पोहायला जाणाऱ्या महिलांना टॉपलेस (Topless) पोहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अशी घोषणा दिल्याचं वृत्त बीसीसीआयने दिलं आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. पुरुष आणि महिलांना समान वागणूक दिली पाहिजे अशी मागणी करताना महिलांनाही स्विमिंग पूलमध्ये (Swimmng Pool) टॉपलेस जाण्याची परवानगी असावी असं महिलेचं म्हणणं होतं. प्रशासनाने तिची ही मागणी मान्य केली आहे.
तक्रारदार महिला ओपन एअर पूलमध्ये टॉपलेस होऊन सनबाथ घेत असल्याने तिला बाहेर काढण्यात आलं होतं. यानंतर महिलेने कायदेशीर पाऊल उचललं होतं. महिलेने सिनेटच्या लोकपाल कार्यालयाकडे धाव घेत, पुरुषांप्रमाणे महिलांना समान वागणूक द्यावी. त्यांनाही स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस जाण्याची परवानगी असावी अशी मागणी केली होती.
या प्रकरणी सुनावणी घेत असताना महिलांशी दुजाभाव होत असल्याचं प्रशासनाने मान्य केलं. यानंतर सर्वांना पूलमध्ये टॉपलेस जाण्याची परवानगी असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रशासनाच्या निर्णयानंतर सार्वजनिक पूल्सची जबाबदारी असणाऱ्या Berliner Baederbetriebe ने आपल्या कपड्यांच्या नियमात बदल केले आहेत.
"Baederbetriebe लोकपाल कार्यालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत. यामधून बर्लिनमधील सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त होत आहेत. या नियमांचं नीट पालन होईल अशी आशा आहे," असं ombudsperson's office च्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान हा नियम कधीपासून लागू होणार हे स्पष्ट झालेलं नाही.