Pakistani Seema Haider Love Story: पबजी खेळता खेळता एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या सीमा आणि सचिन (Sachin Seema Love Story) यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. आपलं प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आलेल्या सीमावरुन (seema haider) देशात सध्या खळबळ माजली आहे. देशाची सीमा ओलांडून ती तिच्या चार मुलांसह ग्रेटर नोएडात राहणाऱ्या सचिनला (Sachin) भेटण्यासाठी आली आहे. ही प्रेमाची गोष्ट अजब वाटली तरी खरी आहे. मात्र अशी घटना पहिल्यांदाच घडली नसून यआधीही पाकिस्तानी (Pakistan) महिला प्रेमाच्या नादात सीमा ओलांडून भारतात आली होती. पुढे या महिलेचे काय झालं पाहूया.
पाकिस्तानात राहणारी इकरा नावाची मुलगी भारतीय तरुण मुलायम सिंह यादवच्या प्रेमात पडली. लूडो खेळताना दोघांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. 16 वर्षांची इकरा पाकिस्तानातील दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद येथे राहत होती. ऑनलाइन लूडो खेळत असताना ती मुलायमच्या प्रेमात पडली. मात्र प्रेमात आंधळ्या झालेल्या इकराने थेट भारत गाठला.
19 सप्टेंबर 2022 रोजी हैदराबादच्या शाही बाजार येथे असलेल्या तिच्या शाळेत जायला निघाली मात्र ती शाळेत गेलीच नाही. दुबई आणि काठमांडू असा प्रवास करत ती भारतात पोहोचली. भारतात आल्यानंतर तिथे बेंगळुरु येथे राहणाऱ्या भारतीय तरुणाशी लग्न केले. लग्नानंतर ती मुलायमसोबतच राहू लागली. मात्र, त्यांचे हे गुपित लोकांसमोरच आलेच.
मुलायमच्या शेजाऱ्यांनी इकराला नमाज पठण करताना पाहिले. तसंच, तिच्या बोलणावरुन त्यांना संशय आला व हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पाकिस्तानातून पळून आल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर इकराचा शोध घेण्यात आला. मुलायमने तिचं नावदेखील बदलून रवा केलं होतं. तसं, आधारकार्डदेखील बनवून घेतलं होतं. तसंच, भारतीय पासपोर्ट बनवण्यासाठी अर्जदेखील केला होता.
इकराच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. इकराने 19 सप्टेंबर 2022मध्ये पाकिस्तानातून विमानाच्या माध्यमातून नेपाळमधील काठमांडू विमानतळावर पोहोचली होती. तिथे मुलायम तिला घेण्यासाठी आला. इकरा भेटल्यानंतर दोघांनी नेपाळमध्येच एका मंदिरात लग्न केलं होतं. त्यानंतर जवळपास एका आठवडा दोघे नेपाळमध्येच राहत होते. त्यानंतर सोनाली बॉर्डरद्वारे ते भारतात आले.
इकरा आणि मुलायम बंगळुरुमध्ये एका लेबर क्वार्टरमध्ये राहत होते. तीन ते चार महिने दोघे एकत्र राहत होते. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होताच भारताने पाकिस्तानातील इकराच्या परिवाराशी संपर्क केला. तसंच, बीएसएफच्या माध्यमातून इकराला पाक रेंजर्सकडे सोपवण्यात आले. तिथेून तिला तिच्या कुटुंबीयांकडे पाठवण्यात आले.