'कितने अच्छे है मोदी' म्हणत ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा मोदींसोबत सेल्फी ट्विट

कितने अच्छे है मोदी असे हिंदी भाषेतील कॅप्शनही या फोटोला त्यांनी दिले. 

Updated: Jun 29, 2019, 12:14 PM IST
'कितने अच्छे है मोदी' म्हणत ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा मोदींसोबत सेल्फी ट्विट  title=

ओसाका : ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा सेल्फी ट्वीट करत मोदींचे कौतूक केलं. पंतप्रधान मोदी किती चांगले आहेत असे कौतुकोद्गार त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल काढले. जी-20 शिखर संमेलनसाठी दोघेही जापानच्या ओसाकामध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचीत पंतप्रधानांनी आज सकाळी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तसेच दोघांनी खूप चांगला वेळ व्यतित केला. मॉरिसन यांनी पंतप्रधान मोदींसोबत त्यांनी एक सेल्फी घेत ट्विटर शेअर केला.कितने अच्छे है मोदी असे हिंदी भाषेतील कॅप्शनही या फोटोला त्यांनी दिले. 

आपआपल्या देशांत झालेल्या निवडणुकीत दोघांनाही विजय मिळवला. याबद्दल दोघांनीही एकमेकांचे अभिनंदन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच एकत्र काम करण्यासाठी कटीबद्धता दर्शवली. 

जी-20 आंतरराष्ट्रीय नेत्यांचा मंच असून यामध्ये 19 देश आणि यूरोपीय संघ सहभागी आहेत. जी-20 हे 14 वे वर्ष असून हे 28 ते 29 जून दरम्यान आयोजित करण्यात आले.