आफ्रीका : प्रत्येक देशाची एक वेगळी खासीयत आणि परंपरा असतात. अशात आफ्रिकन देशातील प्रथा सर्वांचं लक्ष वेधून घेतात. अशीचं एक परंपरा आहे दक्षिण आफ्रिकेतील जुलू जनजातीमध्ये. दक्षिण आफ्रिकेच्या जुलू जमातीमध्ये उमेमुलो नावाची एक अनोखी प्रथा आहे. फार जुन्या असलेल्या या परंपरेत मुलींना त्यांच्या व्हर्जिनिटीचा पुरावा द्यावा लागतो. यावेळी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं जात. शिवाय मुलगी जर व्हिर्जिन असेल तर सण साजरा केला जातो.
दक्षिण आफ्रिकेतील जुलू जमातीतील मुलींना वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत व्हर्जिन रहावं लागतं. जेव्हा मुलगी 21 वर्षांची होते. तेव्हा कुटुंबाकडून एका पार्टीचं आयोजन करण्यात येत. यामध्ये मुलीच्या व्हर्जिनिटीचा सोहळा साजरा करण्यात येतो. या पार्टीमध्ये कुटुंबाकडून नातेवाईकांना निमंत्रण पाठवला जातो.
पार्टी सुरू होण्याआधी मुलीचा सन्मान करत प्राण्याचा बळी दिला जातो. त्यानंतर त्या प्राण्याच्या चामडीने मुलीचं शरीर झाकलं जात. यावेळी मुलीला प्रचंड भेटवस्तू मिळतात. व्हाईस इंडियात लिहिलेल्या लेखात जुलू जमातीची एक महिला थेंबेला म्हणाली की, 'मला ही परंपरा पाळावी लागली. मी 21 वर्षांच्या होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी माझ्या कुटुंबातील सदस्यांनी यासाठी तयारी सुरू केली होती.'
पुढे ती म्हणाली, 'मी खरोखरच कुमारी आहे की नाही याची आईने पुष्टी केली. पारंपारिक ड्रेसनुसार मला टॉपलेस व्हायचे होते.' फार जुन्या असलेल्या या परंपरेत मुलीला संस्कारांचं पालन करावं लागत. लग्नाआधी सेक्स न केल्यामुळे मुलीचा सन्मान केला जातो. यामुळे कुटुंबाला मुलीचा गर्व वाटतो.