सीरिया : १ लाख लोकांचे आफरीनमधून स्थलांतर, यूरोपीय संघाला चिंता

अनेक दिवस उलटूनही सीरियातील स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. सीरियाचे क्षेत्र असलेल्या आफरीनमध्ये तुर्की सेनांनी केलेल्या आक्रमाचा जोरदार फटका तेथील नागरी वस्त्यांना बसला आहे. या परिसरातून आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. या समस्येवर संयुक्त राष्ट्राच्या मानुष्यबळ विभागानेही सोमवारी चिंता व्यक्त केली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 19, 2018, 09:53 PM IST
सीरिया : १ लाख लोकांचे आफरीनमधून स्थलांतर, यूरोपीय संघाला चिंता title=

बेरूद : अनेक दिवस उलटूनही सीरियातील स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. सीरियाचे क्षेत्र असलेल्या आफरीनमध्ये तुर्की सेनांनी केलेल्या आक्रमाचा जोरदार फटका तेथील नागरी वस्त्यांना बसला आहे. या परिसरातून आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. या समस्येवर संयुक्त राष्ट्राच्या मानुष्यबळ विभागानेही सोमवारी चिंता व्यक्त केली.

यरोपीय संघाच्या (ईयू) परराष्ट्र विभागाच्या प्रमुखांनी सीरियातील प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आपरीन वर तुर्की सैन्याने आणि त्यांच्या सहकारी सीरियायी मिलिशीया च्या सदस्यांनी रविवारी या परिसरावर कब्जा मिळवला. त्यानंतरही स्थलांतरणाचा वेग कायम असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या स्थितीत सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे सांगतानाच या प्रयत्नापुर्वीच ९८ हजार लोक स्थलांतरीत झाल्याचे संयुक्त राष्ट्र कार्यालयाने (ओसीएचए) म्हटले आहे. 

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, सुमारे ७५ हजार स्थलांतरीत रफात भागात गेले आहेत. सीरियात गेली काही दिवस छोट्या मोठ्या प्रमाणावर सरकार आणि बंडखोर यांच्यात संघर्ष होत आहे. यात इतर देशांचाही समावेश आहे. त्यामुळे सीरियाच प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे.