लाखो तरुणींना घायाळ करणारा 'पाकिस्तानी चहावाला' पुन्हा चर्चेत

वाचा चर्चेचं मुख्य कारण     

Updated: Oct 6, 2020, 03:41 PM IST
लाखो तरुणींना घायाळ करणारा 'पाकिस्तानी चहावाला' पुन्हा चर्चेत title=

मुंबई : आपल्या निळ्या डोळ्यांनी लाखो तरुणींना घायाळ करणारा पाकिस्तानी चहावाला आता पुन्हा चर्चेत आला आहे. २०१६ मध्ये निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला चहावाला बराच लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात स्टार झालेला अरशद खान तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला कारण देखील तसचं आहे. अरशदने इस्लामाबादमध्ये स्वतःच्या मालकीचा कॅफे सुरु केला आहे. इस्लामाबादच्या रस्त्यांवर चाहा विकणारा  सामान्य मुलगा आता एका कॅफेचा मालक झाला आहे. 

पाकिस्तानमधील फोटोग्राफर जिया अली या तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहावाल्याचा फोटो शेअर केला होता. तेव्हा निळ्या डोळ्यांच्या चायवाल्यांने लाखो तरुणींना घायाळ केलं होतं. त्यानंतर 'पाकिस्तान का चायवाला' या नावाने प्रसिद्ध तो झाला होता. 

अरशदने इस्लाबादमध्ये आपल्या चहा कॅफेचं उद्धाटन केलं आहे. कॅफे चायवाला रूफ टॉप (Cafe Chaiwala Roof Top) असं नाव त्याने त्याच्या कॅफेला दिलं आहे. पाकिस्तानमधील उर्दू न्यूजने या बातमीला दुजोरा दिला आहे. 

 'अनेक लोकांनी मला सांगितलं की कॅफेचं नाव अरशद खान असं सांगितलं पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण चायवाला म्हणून माझी ओळख निर्माण झाली आहे.'  अशी माहिती त्याने उर्दू न्यूजला दिली आहे.