मुंबई : तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात बोलताना अँकरचे शब्द चुकतात किंवा त्यांना ते बोलताना त्रास होतो. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्याला पाहून आपण आनंद लूटतो. परंतु हे होणं सहाजीक आहे. कितीही झालं तरी माणूसच ते इतकं बोलल्यानंतर एखादा शब्द असा येतो, ज्यामुळे तो शब्द उच्चारताना त्रास होतो. परंतु एका महिला अँकरने लाईव शो दरम्यान असं काही केलं, ज्यामुळे ती सर्वत्र ट्रोल होऊ लागली.
हीथर कोवर नावाची महिला अँकर बातमी वाचताना अनेक गडबड करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून महिला अँकर ट्रोलिंगची शिकार झाली. 'न्यूयॉर्क पोस्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही अमेरिकन अँकर सीबीएस 6 मध्ये काम करते. आता या संपूर्ण प्रकरणावर अँकरनेही आपली बाजू उघडपणे मांडली आहे.
'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अँकरची शिफ्ट सकाळी 6 वाजता होती आणि जवळ-जवळ संध्याकाळी झाली होती. ज्यामुळे ती थकली होती आणि तिला खूप झोप देखील येत होती. या प्रकरणाचे पुढे काय झाले हे जाणून घेण्याआधी तुम्ही हा व्हायरल झालेला व्हिडीओ जरूर पहा...
Viewers expressing concern over train wreck of local evening newscast out of Albany. Anchor Heather Kovar appeared disheveled, misspoke, and slurred her words for the entire newscast. Here, she tries to set up the weather and toss to the meteorologist, who’s name she gets wrong. pic.twitter.com/70jwwvykKt
— Mike Sington (@MikeSington) July 10, 2022
व्हिडिओ व्हायरल होताच, टीव्ही चॅनेलने कारवाई करुन अँकरला निलंबित करण्यास सांगितले. या कारवाईनंतर न्यूज अँकरने राजीनामा दिला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात आलंच असेल की एकदा-दोनदा नाही तर अनेक ठिकाणी या अँकरची जीभ घसरली, जसे की गॅस प्लांटच्या स्फोटाची बातमी सांगताना. काही वेळातच ती विचित्र चेहरा करू लागली आणि मग म्हणू लागली कि आज बाहेर काय चांगले दिवस आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्सनी अँकरला खूप ट्रोल केले.
ही महिला अँकर 2016 पासून या चॅनलमध्ये काम करत होती. या घटनेनंतर महिला अँकरनेही ट्विट केले होते, ज्यामध्ये ती दुसऱ्या दिवशीच्या शोमध्ये दिसणार असल्याचे लिहिले होते. पण जेव्हा पुढचा शो टेलिकास्ट झाला तेव्हा तिच्या जागी दुसरा अँकर अँकरिंग करताना दिसला.