'चहा घ्या चहा'...तुमच्या आमच्या सारखं परदेशातही चहाची क्रेझ...

चहाचा एक घोट घेतल्यावर आत्मा तृप्त होतो. भारत चहाप्रेमी असल्याचं म्हटलं जातं. 

Updated: Jul 13, 2022, 07:10 PM IST
 'चहा घ्या चहा'...तुमच्या आमच्या सारखं परदेशातही चहाची क्रेझ... title=

Viral Video : पावसाळा म्हटलं की आठवतो गरमा गरम चहा. चहाचा एक घोट घेतल्यावर आत्मा तृप्त होतो. भारत चहाप्रेमी असल्याचं म्हटलं जातं. आपल्या आजूबाजूला अनेक चहाप्रेमी दिसतात. 'चला चहा घेऊयात', असं म्हटलं की अनेक जण एका पायावर तयार असतात. सकाळी उठल्यावर मस्त असा कडक चहा मिळाला की, पूर्ण दिवसासाठी एनर्जी मिळते. असं म्हणतात, एक चहाप्रेमी दुसऱ्या चहाप्रेमीला लगेच आपलं बनवतात.

बॉलिवूडला चहाचा मोह सुटलेला नाही. 'एक गर्म चाय की प्याली हो उसको पिलाने वाली हो', सलमान खानचं हे गाणं तुम्हाला आठवलं असेल. चहाने भारतीयांना नाही तर परदेशांना पण वेड लावलं आहे. सोशल मीडियावर एका व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या व्हिडीओमध्ये एक महिलेचं चहावरील प्रेम दिसून येत आहे.

'चहा घ्या चहा...'

या व्हिडीओमध्ये एक परदेशी महिला Fluent हिंदी बोलत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही महिला चहाचे ग्लास घेऊन एका रुममध्ये एन्ट्री घेते. आणि म्हणते कशी, ''चहा गरमा गरम चहा, मॅडम गरम चहा? मॅडम, मी तुमच्यासाठी स्पेशल गरम चहा बनवला आहे. तुम्हाला हवा का हा गरम चहा? मी बनवला आहे हा चहा. तुमच्यासाठी हा स्पेशल गरम चहा.'' या व्हिडीओमध्ये ही महिला ज्याप्रकारे मस्त हिंदी बोलतेय ते पाहून वाटतं तिने नक्की हिंदीचा क्लास केला असेल.

हा व्हिडीओ desiismybae नाम या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त यूजर्सने पाहिला आहे. तर 42 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Desiismybae (@desiismybae)

जसा जसा हा व्हिडीओ व्हायरल होतोय यूजर्सची संख्या वाढत जात आहे. या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स पण येत आहेत. काही कमेंट्स पाहूयात. एक यूजर म्हणतो, ''खरंच या परदेशी महिलेची हिंदी खूपच जबरदस्त आहे.'' तर दुसरा यूजर म्हणतो की, ''ही महिला माझ्या आणि माझ्या कुटुंबियांपेक्षा जास्त छान हिंदी बोलते.'' तर एक यूजरने तर गंमतीशीर कमेंट केली आहे. तो म्हणतो, ''माझी हिंदी टीचर या महिलेजवळ कशी पोहोचली?''