'या वेळेस पृथ्वीवर एलिअन्स करणार अटॅक'

   पृथ्वीवर एलिअन अटॅक करणार असल्याचा दावा एका अमेरिकन नागरीकाने केला आहे. पुढच्यावर्षी पृथ्वीवर एलिअन्स अटॅक करणार असून तो यासंबंधी अमेरिकन प्रेसिडंटना भेटू इच्छित आहे. ब्रायंट जॉन्सन असे त्या तरुणाचे नाव आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 5, 2017, 05:13 PM IST
 'या वेळेस पृथ्वीवर एलिअन्स करणार अटॅक' title=

अमेरिका :   पृथ्वीवर एलिअन अटॅक करणार असल्याचा दावा एका अमेरिकन नागरीकाने केला आहे. पुढच्यावर्षी पृथ्वीवर एलिअन्स अटॅक करणार असून तो यासंबंधी अमेरिकन प्रेसिडंटना भेटू इच्छित आहे. ब्रायंट जॉन्सन असे त्या तरुणाचे नाव आहे.

हफिंग्टन पोस्ट मधील वृत्तानुसार, आपण या जगाचे नाही आहोत असा दावा त्या इसमाने पोलिसांसमोर केला. २०४८ व्या वर्षातून तो आला आहे. पृथ्वीवर लवकरच एलिअन्स अटॅक करणार असून आपल्याला लवकरात लवकर सुरक्षित जागा शोधावी लागेल असेही त्याने सांगितले.

वृत्तानुसार ही घटना घडण्याची निश्चित काळ-वेळ सांगितली नाही. पण त्याला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत यासंबधी चर्चा करायची आहे.

मला थेट २०१८ मध्ये जायचे होते पण २०१७ मध्ये पोहोचलो असेही त्याने पोलिसांना सांगितले. टाईम ट्रॅव्हल करण्याआधी एलिअंन्सनी त्याच्या शरीराला दारुने भरले आहे म्हणून आपण नशेत आहोत असेही त्याने पोलिसांना सांगितले. 

दरम्यान अमेरिकन पोलिसांनी याला अटक केली तेव्हा तो नशेत होता असेही सांगण्यात येत आहे.

जगबुडी येणार, सर्व नष्ट होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आपण ऐकल्या होत्या. पण असे काही न झाल्याने हे सर्व धोतांड असल्याचे समोर आले पण यावेळेस एक वेगळे प्रकरण समोर आले आहे.