हवेत उडणाऱ्या विमानाच्या अगदी जवळ पोहोचला फायटर जेट, दृश्य पाहून प्रवाशांनी रोखला श्वास

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेट विमान हा या लढाऊ विमानाच्या अगदी जवळ आले होते.

Updated: Jul 4, 2022, 08:15 PM IST
हवेत उडणाऱ्या विमानाच्या अगदी जवळ पोहोचला फायटर जेट, दृश्य पाहून प्रवाशांनी रोखला श्वास title=

मुंबई : विमाना चालवणं सोपं काम नाही. कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतु शकते. इझीजेटच्या विमाना सोबतही अशीच घटना घडली, जी पाहून विमानातील प्रवाशांचे अंग सुन्नं झाले आहे. आता या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे. मात्र, नंतर या घटनेचे सत्य समोर आले आणि विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लढाऊ विमानाने त्याचा पाठलाग केल्याचे समजले.

'द सन'च्या वृत्तानुसार, गॉटविकहून मेनोकाला जाणाऱ्या इझी जेटच्या विमानाचा आकाशात एका लढाऊ विमानाने पाठलाग केला. एका प्रवाशाने खिडकीच्या सीटवरून त्या जेट विमानाचा व्हिडीओ बनवला जो धक्कादायक आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेट विमान हा या लढाऊ विमानाच्या अगदी जवळ आले होते. त्यामुळे हे व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकावणारा व्हिडीओ ठरला आहे. व्हिडीओमध्ये ते एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे दिसत असले तरी, या घटनेदरम्यान आत बसलेल्या प्रवाशांच्या जीवावर बेतले होते.

इझीजेटचा फ्लाइट क्रमांक EZY8303 हे विमान स्पेनच्या मेनोकारा बेटावरून उड्डाण करत असताना जेटने एस्कॉर्ट केले होते. या घटनेमुळे प्रवासी विमान सुमारे 30 मिनिटे उशिराने उतरले आणि सुमारे चार तास विमानतळावर उभे होते.

इझीजेटने या घटनेला दुजोरा देत सांगितले की, त्यांचे एक प्रवासी विमान मोनोर्कामध्ये उतरत असताना ही घटना घडली.

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "इझीजेट पुष्टी करू शकते की लंडन गॅटविक ते मोनोर्का येथे फ्लाइट क्रमांक EZY8303 मोनोर्कामध्ये उतरताना लष्करी विमानाने एस्कॉर्ट केले होते आणि सावधगिरीच्या सुरक्षा तपासणीमुळे ते उशिराने उतरले होते."

कंपनीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आमचे प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेला नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि प्रवाशांनी समजून घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. लढाऊ विमाने कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात आणि केवळ गंभीर परिस्थितीतच ते प्रवासी विमानांना अडवतात किंवा त्यांचा पाठलाग करतात.

ट्विटरवर हा व्हिडीओ 58 हजार वेळा पाहिला गेला असून यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या अफवेमुळे फायटर जेटने त्याचा पाठलाग केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

एका ब्रिटीश नागरिकाने फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची खोटी अफवा पसरवली होती, त्याला नंतर त्याला अटक करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

विमान स्पेनमध्ये उतरताच विमानतळावर डॉग स्कॉड टीम आणि बॉम्ब निकामी पथक तैनात करण्यात आले होते. यानंतर संपूर्ण विमानाची झडती घेण्यात आली मात्र काहीही सापडले नाही.