कोरोनानंतर यूरोपमध्ये आणखी एका आजाराचा धोका

कोरोनाच्या संकटात आता यूरोपमध्ये आणखी एका धोकादायक रोग पसरत आहे.

Updated: Apr 15, 2020, 11:22 AM IST
कोरोनानंतर यूरोपमध्ये आणखी एका आजाराचा धोका title=
संग्रहित फोटो

रोम : संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट आहे. यूरोपमध्येही कोरोनाने हाहाकार माजला आहे. या कोरोनाच्या संकटात आता यूरोपमध्ये आणखी एक धोकादायक रोग पसरत आहे. या रोगामुळे ऑलिव्हच्या झाडांवर मोठा परिणाम होत आहे. यूरोपमध्ये या घातक रोगाने प्रभावित झालेल्या ऑलिव्हच्या झाडांची किंमत 20 बिलियन यूरोहूनही अधिक आहे. संशोधकांनी इटली, स्पेन आणि ग्रीसबाबतही अनुमान लावला आहे. यूरोपियन ऑलिव्ह तेलाचं 95 टक्के उत्पादन याच देशांतून येतं.

हे अध्ययन प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेज (पीएनएएस) या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. अध्ययनानुसार, एकट्या स्पेनमधून येणाऱ्या 50 वर्षात 17 अब्ज यूरोचं नुकसान होऊ शकतं. इटलीमध्येही अशाचप्रकारे 5 अब्ज यूरोहून अधिक तर ग्रीसमध्ये 2 अब्जांपर्यंत नुकसान होऊ शकतं.

जायलेला फास्टिडिओसा  (Xylella fastidiosa) नावाचा रोग, झाडांचा रस शोषून घेणाऱ्या किड्यांद्वारे पसरतो. या जिवाणूमुळे इटलीमध्ये अनेक झाडं कापण्यात आली आहेत. इटलीप्रमाणचे स्पेन आणि ग्रीसमध्ये ऑलिव्हच्या झाडांवर संभावित धोका घोंघावत आहे. संशोधकांनी या आजारापासून होणाऱ्या प्रतिकूल परिणामांचं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणातून आगामी काळात ऑलिव्ह ऑईलच्या किंमती वाढू शकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जायलेला रोगाला जगभरातील झाडांवरील सर्वात धोकादायक रोगांपैकी एक मानलं जातं. या रोगाचा संसर्ग चेरी, बदाम, बोरं या झाडांसह ऑलिव्हवरही होऊ शकतो. या संसर्गावर सध्या कोणताही इलाज नाही. या रोगामुळे झाडांची पाणी आणि पोषकद्रव्यं शोषून घेण्याची क्षमता मर्यादित होऊ शकते.

या रोगामुळे झाडं, पाणी आणि पोषकद्रव्यं पुरेशा प्रमाणात घेत नाही, परिणामी झाडं सुकतं आणि शेवटी मरतं. इटलीशिवाय हा जायलेला जिवाणू आता स्पेन, फ्रान्स आणि पोर्तुगालमध्येही आढळत आहे.