Monkeypox Case Found : भारतातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला होता. या विषाणूने अनेकांचे प्राण घेतले. चीनच्या बेजबाबदारीमुळे कोरोना सारखा घातक विषाणू जगभरात पसरला असं मानलं जातं. आता मंकीपॉक्समुळे अनेक जण चिंतेत आहेत. असं असताना चीनमध्ये मंकीपॉक्समुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, चीनच्या एका आरोग्य अधिकाऱ्याने देशातील नागरिकांना मंकीपॉक्सपादूर राहण्यासाठी अजब सल्ला दिला आहे. (Monkeypox First Case Found in China)
चीनच्या डॉक्टरांनी (Chinese doctors) म्हटले आहे की, परदेशी आणि नुकतेच परदेशातून परतलेल्या लोकांशी त्वचेचा संपर्क करू नका. डॉक्टरांच्या या इशाऱ्याला वर्णद्वेषी आणि भेदभाव (Racism and discrimination) करणारा असल्याचे सांगून सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर कमेंट करत संताप व्यक्त केला.
नक्की असं काय झालं?
शुक्रवारी चीनच्या चोंगकिंग शहरामध्ये मंकीपॉक्सचा (Monkeypox Found in China)) पहिला रुग्ण आढळला. ही व्यक्ती नुकताच परदेशातून आल्यामुळे चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अजब फतवा जारी केला आहे. मंकीपॉक्सचं निदान झाल्यानंतर ही व्यक्ती मार्गदर्शक तत्वांनुसार क्वारंटाईन देखील होती.
त्याच वेळी, चीनचे शीर्ष महामारीशास्त्रज्ञ वू ज़ुनयू यांनी नागरिकांना चेतावणी दिली. नागरिकांनी परदेशी लोकांशी त्वचेचा संपर्क न ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
काही लोकांनी याला जातीयवादी म्हटलं आहे...
हाँगकाँग स्थित साउथ चायना मॉर्निंग पोस्टने रविवारी सांगितलं की, वू ज़ुनयू यांनी अनोळख्या व्यक्तींसोबत त्वचेचा संपर्क न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नाही तर, हॉटेलसह सार्वजनिक सोयींमध्ये डिस्पोजेबल टॉयलेट सीट कव्हर वापरण्यास सांगितलं आहे.
मंकीपॉक्सच्या (Monkeypox) पार्श्वभूमावर वू ज़ुनयू यांनी दिलेल्या सूचनांची चीनी इंटरनेट (Chinese internert users) वापरकर्त्यांनी खिल्ली उडवली आहे. काहींनी तर त्यावर वर्णद्वेषी आणि भेदभाव असल्याची टीका केली आहे.
सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस (China)
एक नागरिकाने कमेंट करत लिहिलं की, 'किती वर्णद्वेष आहे? माझ्यासारख्या लोकांचे काय जे चीनमध्ये जवळपास 10 वर्षांपासून राहत आहेत. आम्ही 3-4 वर्षांपासून आमच्या कुटुंबाला भेटलो नाही.
आणखी एका यूजरने याबद्दल लिहिले, 'खूप अन्यायकारक, अजूनही चीनमध्ये बरेच परदेशी मित्र काम करत आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीला जेव्हा संपूर्ण जग चीनला खलनायक मानत होतं, तेव्हा या मित्रांनी उभे राहून सर्वांना सांगितले की चिनी लोक व्हायरस नाहीत.