मोठी बातमी । काबूलमध्ये पोहोचलेल्या युक्रेन विमानाचे अपहरण, इराणला नेण्यात आले

Afghanistan crisis : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा (Taliban) ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.  

Updated: Aug 24, 2021, 01:55 PM IST
मोठी बातमी । काबूलमध्ये पोहोचलेल्या युक्रेन विमानाचे अपहरण, इराणला नेण्यात आले title=
संग्रहित छाया

काबूल: Afghanistan crisis अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा (Taliban) ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. दरम्यान, युक्रेनच्या विमानाचे काबूलमध्ये अपहरण करण्यात आले आहे. (Ukrainian Plane Hijacked) हे हायजॅक केलेले विमान इराणला नेण्यात आलेचे वृत्त आहे. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन  (Yevgeny Yenin) यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेनियन विमान आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काबूलला पोहोचले होते, जे अज्ञात लोकांनी अपहरण केले आहे.

विमान अपहरणानंतर इराणला नेण्यात आले

युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन म्हणाले, 'हे युक्रेनियन विमान रविवारी अपहरण करण्यात आले होते. जे काही अज्ञात लोकांनी ताब्यात घेतले होते. यानंतर हे विमान मंगळवारी इराणला नेण्यात आले आहे. ज्यात अज्ञात लोक बसले आहेत. त्यांनी सांगितले की एवढेच नाही तर आमच्या नागरिकांची स्थलांतर योजना देखील यशस्वी होऊ शकत नाही, कारण आमचे लोक विमानतळावर पोहोचू शकले नाहीत. प्रचंड गर्दीमुळे काबूल विमानतळाबाहेर परिस्थिती अस्थिर झाली आहे.

 दरम्यान, तालिबानने (Taliban) ब्रिटिश (Britain) सैन्याला अफगाणिस्तानातून (Afghanistan) बाहेर पडण्याची मुदत दिली आहे. दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, जर ब्रिटीश सैन्य एका आठवड्याच्या आत माघारी परतले नाही तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. काबूल विमानतळ सध्या अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याच्या ताब्यात आहे. दोन्ही देश आपल्या नागरिकांना तसेच अफगाण लोकांना सुरक्षित परिस्थितीत बाहेर काढत आहेत. ज्या प्रकारची परिस्थिती आहे, ते पाहता एका आठवड्यात बचावकार्य पूर्ण करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तालिबानच्या डेडलाइनमुळे ब्रिटनची चिंता वाढली आहे.

'द सन' च्या अहवालानुसार, तालिबानने धमकी दिली आहे की, जर ब्रिटिश सैन्याने एका आठवड्याच्या आत काबूल विमानतळ सोडले नाही तर त्यांना युद्धासाठी तयार राहावे लागेल. दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, एक मिनिटाचाही विलंब भयंकर संघर्षाला कारणीभूत ठरु शकतो. जॉन्सन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अफगाणिस्तानातून माघार घेण्याची 31 ऑगस्टची मुदत वाढवण्यास सांगतील, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढता येईल.