मुंबई : Afghanistan crisis : तालिबानने (Kabul) अफगाणिस्तानवर (Afghanistan)कब्जा केल्यानंतर आता प्रत्येकाला तिथून बाहेर पडायचे आहे. काबूल विमानतळाबाहेर (Kabul Airport) हजारो लोक या आशेने उभे आहेत की कोणी त्यांना या देशाबाहेर नेईल. त्यांच्या नागरिकांव्यतिरिक्त भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांनीही अफगाण लोकांना तेथून सोडवले आहे. पण तरीही असे बरेच लोक आहेत ज्यांना अजूनही देश सोडायचा आहे पण त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. असे असताना केवळ एका महिलेला घेऊन काबूलहून विमान हवेत झेपावले.
काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच चेंगराचेंगरी दरम्यान, काबूल विमानतळावरुन एक विमानाने उड्डाण केले, ज्यात क्रू व्यतिरिक्त फक्त एक महिला होती. आता लोक याबद्दल ट्विटरवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. माजी रॉयल मरीन कमांडो पॉल पेन फार्थिंक यांनी आपल्या पत्नीला काबूलमधून बाहेर काढण्याची कहाणी लोकांसाठी शेअर केली आणि इशारा केला आहे की आम्ही अजूनही अनेक लोकांना तिथे सोडले आहे.
पॉल पेनची पत्नी कइसा हजारो लोकांप्रमाणे काबूलमध्ये अडकली होती आणि तिला तेथून सी -17 ग्लोबमास्टरच्या मदतीने नॉर्वेला आणण्यात आले. पण पॉलच्या पत्नीशिवाय या विमानात दुसरा प्रवासी नव्हता, तर हजारो लोक काबूलमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळाबाहेर जमले आहेत. या विमानाचा फोटो ट्विट करताना पॉलने सांगितले की कइसा घरी जात आहे, पण हे विमान पूर्णपणे रिकामे आहे.
माजी मरीन कमांडोने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले, 'हे निंदनीय आहे, कारण हजारो लोक काबूल विमानतळाच्या बाहेर वाट पाहत आहेत आणि त्यांना मारले जात आहे.' पॉल म्हणाले की जेव्हा हे मिशन संपेल तेव्हा दुःखाची गोष्ट म्हणजे आपण अनेक लोकांना मागे सोडले असेल. आम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही.
स्काय न्यूजशी दिलेल्या मुलाखतीत पॉलने सांगितले की काबूल विमानतळावरुन विमाने दर तासाला उड्डाण घेत आहेत, मग ती पूर्ण भरलेली आहेत किंवा रिकामी. लोक आत बसू शकत नाहीत कारण त्यांना विमानतळावर प्रवेश करण्याची परवानगी देखील दिली जात नाही. या संपूर्ण घटनेवर त्यांनी तीव्र दु: ख व्यक्त केले आहे. दरम्यान, ब्रिटिश संरक्षण मंत्रालय म्हणते की हे विमान त्यांच्या मालकीचे नाही.
त्याच्या ट्विटनंतर लोकांनी रिकाम्या विमानाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया यूजर्स म्हणतात की विमानाला रिकामे उडण्याची परवानगी का देण्यात आली. त्यात जास्त लोक बसू शकले नसते का?