भयानक! 5 वर्षांपासून मृतदेहासोबत झोपत होती महिला; घरातील दृष्य पाहून पोलिसही हादरले

ऑस्ट्रेलियात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एक  महिला तब्बल 5 वर्षे तिच्या भावाच्या मृतदेहासोहत राहत होती. 

Updated: Feb 21, 2024, 05:08 PM IST
भयानक! 5 वर्षांपासून मृतदेहासोबत झोपत होती महिला; घरातील दृष्य पाहून पोलिसही हादरले title=

Shocking News : एक महिला तब्बल 5 वर्ष मृतदेहासोबत झोपत होती. महिलेने घरातच हा मृतदेह ठेवला होता. या महिलेच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. यामुळे शेजाऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या महिलेच्या घरी दाखल झाले. मात्र, घरात शिरताच समोर जे दृष्य दिसले ते पाहून पोलिस हादरले आणि त्यांना किळस आली. ऑस्ट्रेलियाती हा धक्कादायक प्रकार आहे. 

न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील रसेल स्ट्रीट या उच्चभ्रू परिसरात हा विचित्र प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलिया पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या महिलेच्या घरातून रक्ताने माखलेला एक सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एका पुरुषाचा हा सांगाडा आहे.  पोलिसांनी महिलेला संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. 

घरातील दृष्य पाहून पोलिसांना धक्का बसला

28 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता पोलिस महिलेच्या घरी दाखल होते. संधित महिलेच्या घरातून दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांनी अनेकदा याची तक्रार केली. जेव्हा शेजारी तक्रार करण्यासाठी या महिलेच्या घरी जायचे तेव्हा ही महिला दरवाजाच उघडायची नाही. शेजाऱ्यांशी ती उद्धटपणे बोलायची. वारंवार सूचना करुनही महिला दुर्लक्ष करत असल्याने शेजाऱ्यांनी शेवटी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पलोिस या महिलेच्या घरी दाखल झाले आहे. यानंतर अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिस आले तरी महिला दरवाजा उघडत नव्हती. यामुळे पोलिस जबरदस्ती या महिलेच्या घरात दिसले. मात्र, समोर जे दिसलं ते पाहून पोलिस हादरले.  कचऱ्याचा ढीग घराच्या उतापर्यंत पोहचला होता. मल मुत्र आणि सर्वत्र घाणीची साम्राज्य होते. घरात सर्वत्र उंदीर फिरत होते. घराची अवस्था कचराकुंडीपेक्षा घाणेरडी होती. अशा घाणीत ही महिला कशी काय राहत होती असा प्रश्न शेजाऱ्यांसह पोलिसांना पडला. कचऱ्यातुन वाट काढत नाकाला रुमाल बांधून पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. 

घरात मृतदेह सापडला

तपासादरम्यान पोलिसांना घरात एक मृतदेह देखील सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सर्व मांस गळून गेले होते जवळपास हाडांचा सांगाडाच उरला होता. हा मृतदेह महिलेच्या असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. जवळपास पाच वर्ष ही महिला या मृतदेहासोबत राहत होती असा दावा शेजाऱ्यांनी केला आहे. कारण, या महिलेचा भाऊ पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेताल आहे. मात्र, तिच्या भावाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. महिला मनोरुग्ण असावी असा पोलिसांचा संशय आहे.  शेजाऱ्यांनी 2021 मध्येच याची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे केली होती. मात्र, याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही असा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे.