एक नव्हे दोन प्रायव्हेट पार्ट; पाकिस्तानात जन्माला आले अनोखं बाळ, डॉक्टरही झाले शॉक

बऱ्याचदा मुलांमध्ये जन्मत:च शारीरिक दोष आढळून येतात. मात्र, बऱ्याचदा हे दोष इतके विचित्र आणि आरोग्य यंत्रणेला आव्हान देणारे असे असतात. असेच एक बाळ पाकिस्तानात जन्माला आले आहे. या बाळाला दोन प्रायव्हेट पार्ट आहेत.

वनिता कांबळे | Updated: Apr 28, 2023, 09:23 PM IST
एक नव्हे दोन प्रायव्हेट पार्ट; पाकिस्तानात जन्माला आले अनोखं बाळ, डॉक्टरही झाले शॉक title=

Ajab Gajab News : आई नऊ महिने पोटात गर्भ वाढवून बाळाला जन्म देते. मतृत्वाची चाहूल लागल्यापासून बाळ कसं असेल? मुलगा असेल की मुलगी असेल? बाळ कसे दिसेल. ते शारीरदृष्ट्या कसे असेल असे अनेक प्रश्न पडतात. मात्र, या सर्व प्रश्नांची उत्तर बाळ जन्माला आल्यानंतरच मिळतात.  बाळ जन्माला आव्यानंतर अनेकदा त्याच्यात व्यंग आढळतात. पाकिस्तानात विचार बाळ जन्माला आले आहे. या बाळाला  एक नव्हे तर दोन प्रायव्हेट पार्ट आहेत. हे बाळ पाहून डॉक्टरही शॉक झाले  आहेत. 

डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे.  शारिरीक हालचाली सुरुळीत कार्यन्वित राहण्यासाठी प्रत्येत अवयव कार्य करत असतो. या अवयवामध्ये काही दोष असल्यास वैदकीय मदतीने ते दूर केले जातात. बऱ्याचदा मुलांमध्ये जन्मत:च शारीरिक दोष आढळून येतात. मात्र, बऱ्याचदा हे दोष इतके विचित्र आणि आरोग्य यंत्रणेला आव्हान देणारे असे असतात. असेच एक बाळ पाकिस्तानात जन्माला आले आहे. या बाळाला दोन प्रायव्हेट पार्ट आहेत. 

बाळाला पाहून डॉक्टरांना धक्का बसला

पुरुष जातीचे हे नवजात बाळ  आहे. या बाळाला दोन प्रायव्हेट पार्ट आहेत. मूत्र विसर्जनासाठी या प्रायव्हेट पार्टचा वापर होतो. बाळाचे दोन्ही पार्ट कार्यन्वित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाळाचा एक प्रायव्हेट पार्ट दुसऱ्यापेक्षा एक सेंटीमीटर मोठा असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. विषेष म्हणजे हे बाळ निरोगी होते. याच्यामध्ये कोणतेच दुसरेही शारिरीक दोष आढळून आले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या बाळाला दोनच दिवसात रुग्णालायातून घरी सोडण्यात आले.

एक पार्ट काढून टाकण गरजेचे

इंटरनेशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये देखील या मुलाच्या अजब केसबाबत नमूद करण्यात आले आहे. इस्लामाबादमधील जन्मलेल्या या अनोख्या बाळाबाबत आणखी एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.  या बाळाला दोन प्रायव्हेट पार्ट आहेत. मात्र, याला गुदद्वार अर्थात मलद्वार नाही. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे बाळाच्या शरीरात एक छोटे छिद्र तयार केले आहे. छिद्राद्वारे मस विसर्जन करता येईल असे डॉक्टरांनी सांगितले. 

डिफेलिया... विचित्र शारिरीक स्थिती

या विचित्र शारिरीक स्थितीला वैद्यकिय भाषेत डिफेलिया  (Diphallia)  असे म्हणतात. हा अत्यंत दुर्मिळ शारिरीक दोष आहे.  60 लाख लोकांमध्ये एकामध्येच असा दोष आढळून येतो. आतापर्यंतच्या वैद्यकिय इतिहासात 100 प्रकरण समोर आली आहेत. सर्व प्रथम 1609 मध्ये दोन प्रायव्हेट पार्ट असलेले बाळ जन्माला आल्याचे संशोधकांनी सांगितले.