9 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने केला पोल डान्स...

प्रेग्नंसीच्या काळात महिल्याच्या शरीरात अनेक बदल होतात.

Updated: Mar 28, 2018, 01:57 PM IST
9 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने केला पोल डान्स... title=

नवी दिल्ली : प्रेग्नंसीच्या काळात महिल्याच्या शरीरात अनेक बदल होतात. शारीरिक, मानसिक आणि भावनिकही. अशावेळी महिलांची अधिक काळजी घेतली जाते. हे करावे किंवा करु नये, असे अनेक सल्ले दिले जातात.पण एका प्रेग्नेंट महिलेचा पराक्रम पाहुन तुम्ही थक्क व्हाल. नऊ महिन्याच्या प्रेग्नेंट महिलेने चक्क पोल डान्स केला आहे. फ्लोरिडाची ही महिला पेशाने डान्सर आहे. तिने प्रेग्नंसीच्या काळातही डान्स करणे सोडले नाही.

कोण आहे ती?

तिच्या या अनोख्या प्रयत्नामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे नाव आहे एलिसन साईप्स. तिच्या या पराक्रमाबद्दल ती म्हणते की, मी सध्या 38 आठवड्यांची प्रेग्नेंट आहे. गेल्या 13 वर्षांपासून मी पोल डान्स करते आहे. हा डान्स करता मी अत्यंत सतर्क असते.

पहा तिच्या या अनोख्या पराक्रमाचे खास व्हिडिओज...