नदीमध्ये सापडले ६४ मानवी हातांचे पंजे, पोलीसही हैराण

रशियातील एका नदिकिनारी सापडलेल्या बेवारस बॅगमुळे जगभरात खळबळ माजली आहे. कारण ही बॅग उघडलल्यानंतर अस काही दिसल जे सर्वांनाच धक्का देणारं होतं.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 11, 2018, 03:33 PM IST
 नदीमध्ये सापडले ६४ मानवी हातांचे पंजे, पोलीसही हैराण title=

रशिया : रशियातील एका नदिकिनारी सापडलेल्या बेवारस बॅगमुळे जगभरात खळबळ माजली आहे. कारण ही बॅग उघडलल्यानंतर अस काही दिसल जे सर्वांनाच धक्का देणारं होतं.

बेवारस बॅगमध्ये हात 

सायबेरिया विभागात खबरोव्सक शहराला लागून असलेल्या अमूर नदीकिनारी मच्छिमारांना बेवारस बॅग आढळली.

जेव्हा त्यांनी ही बॅग उघडून पाहीली तेव्हा त्यांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. कारण त्यामध्ये ५४ कापलेले मानवी हाथ पाहायला मिळाले. 

रशियातून समोर आलेल्या घटनेमुळे जगभरातील जनतेची झोप उडाली आहे. याप्रकरणी कोणाही विरोधात असून ठोस पुरावा सापडला नाहीए.

पुरावा सापडला नाही 

ज्याठिकाणी ही बॅग सापडली तो प्रसिद्ध फिशिंग स्पॉट आहे. नदीच्या आसपासही असा कोणताच पुरावा सापडला नाही. पोलिसांसाठीदेखील ही धक्कादायक घटना होती. या सगळ्याला जबाबादार कोण ? असा प्रश्न विचारला जातोय.

फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार 

हे प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसांनी बॅग आणि त्यातील कापलेले हात ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक एक्सपर्टकडे पाठविले आहेत. फिंगरप्रिंट्सच्या मदतीने सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहेत.