कराची : पाकिस्तानमध्ये अतिरेकी हल्ल्यांच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान ३८ जण ठार झालेत.
क्वेट्टा शहरात पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाजवळ आत्मघातकी अतिरेक्यांनी कारबॉम्बचा स्फोट घडवला. यामध्ये ७ पोलिसांसह १३ जण ठार तर २१ जण जखमी झालेत.
इस्लामिक स्टेटची स्थानिक शाखा असलेल्या जामात उल अहरार ही अतिरेकी संघटना आणि तहरीक ए तालिबान पाकिस्तना या दोन्ही संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीये.
अफगाणिस्तान सीमेनजिक पाराचिनार शहरात गजबजलेल्या बाजारात दोन स्फोट झाले. यात किमान २५ जण जखमी तर १००पेक्षा जास्त नागरिक जखमी झालेत. ईदच्या खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी असतानाच हे स्फोट घडवण्यात आले.