बाबो! या दारूत आहे 24 कॅरेट सोनं, किंमत Luxury Car पेक्षाही महाग

24 कॅरेट गोल्ड माहित आहे पण 24 कॅरेट सोन्याची दारू कधी पाहिली आहे का? देशातील सर्वात महाग दारू, वाचा काय आहे या दारूची खासियत  

Updated: Nov 4, 2022, 08:01 PM IST
बाबो! या दारूत आहे 24 कॅरेट सोनं, किंमत Luxury Car पेक्षाही महाग title=

24 Carat Gold Cocktail : तुम्ही 24 कॅरेट सोनं पाहिलं असेल, पण कधी 24 कॅरेट सोनं असलेली दारू पाहिली आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) पहिल्यांदाच असं महागडं कॉकटेल (Cocktail) बनवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीतल्या 'के डीन एंड नँन्सी' आणि मेलबर्नमधल्या 'स्काय' दोन बारने मिळून हे कॉकटेल तयार केलं आहे. या कॉकटेलला 'द वुडफोर्ड रिजर्व गोल्ड फँशंड' (Woodford Reserve Gold Fashioned)असं नाव देण्यात आलं आहे. या कॉकटेलचं वैशिष्ट्य म्हणजे यात चक्क 24 कॅरेट सोन मिसळवण्यात आलं आहे. 

कॉकटेलची किंमत लाखोंच्या घरात
हे कॉकटेल बनवण्यासाटी दोन महागड्या वाईनचा वापर करण्यात आला आहे. यापैकी एका वाईनचं नाव आहे 'बरबन व्हिस्की वुडफोर्ड रिझर्व्ह'. या वाईच्या एका बाटलीची किंमत 3 हजार डॉलर म्हणजे जवळपास अडीच लाख रुपये इतकी आहे. याशिवाय यात फ्रेंच वाईन Chateau d’Yquem चाही समावेश आहे. याशिवाय यात 24 कॅरेट सोनं आहे. त्यामुळे या कॉकटेलची किंमत 15 हजार डॉलर म्हणजे तब्बल 12 लाख 35 हजार रुपये इतकी आहे. 

2022 के वुडफायर रिजर्व ओल्ड फॅशंड वीकच्या निमित्ताने हे कॉकटेल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे कॉकटेल घेणाऱ्या ग्राहकांसाठी काही आकर्षक भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. म्हणजे ग्राहक 3 हजार किंमतीची वुडफोर्ड रिझर्व्ह वाईनची बाटली मोफत घेऊन जाऊ शकतो. याशिवाय चांदीचा शेकर आणि फ्रेंच किस्टल ग्लासही दिले जाणार आहेत. या कॉकटेलला ऑरेंज आणि वॅनिलाचा फ्लेव्हर देण्यात आला आहे. 

एका अहवालानुसार वुडफोर्ड रिजर्व गोल्ड फॅशंड कॉकटेल जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महागडं कॉकटेल आहे. पहिल्या क्रमांकावर रिट्स कार्लटन टोकियोची मार्टिनी ड्रिंक डायमंडस फॉर एव्हर (Ritz-Carlton Tokyo’s Diamonds Are Forever Martini) हे कॉकटेल आहे. या कॉकटेलची किंमत 29 हजार 600 डॉलर म्हणजे जवळपास 24 लाख 35 हजार रुपये इतकी आहे.