मुंबई : वडापाव म्हणजे गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा मुंबईकरांसाठी गरम-गरम वडापाव म्हणजे जीव की प्राण. फार फार तर १५ ते २० रुपयांपर्यंत मिळणारा वडापाव 2 हजार रुपयांना मिळू लागला तर. आश्चर्च वाटलं ना, पण हे खरं आहे. कारण हा आहे सोन्याचा वडापाव. कुठे मिळतोय हा सोन्याचा वडापाव याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (22 carat gold plated Vadapav sell in Dubai for Rs 2 thousand rupees)
इथं मिळतोय तब्बल 2 हजार रुपयांना एक वडापाव. आता तुम्ही म्हणाल या वडापावला काय सोनं लागलाय का? तर खरंच हा सोन्याचा वडापाव आहे. मुंबईत फार फार तर 12 ते 20 रुपयांना मिळणारा वडापाव. पण दुबईतल्या या वडापावची किंमत आहे फक्त 2 हजार रुपये. किंमत वाचूनच धक्का बसला ना? हा वडापाव एवढा महाग असण्याचं कारण म्हणजे तो गोल्ड प्लेटेड आहे. म्हणजे यावर 22 कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आलाय. सोन्यासोबतच ट्रफल बटर आणि चीजही असल्यानं हा वडापाव इतका महाग आहे.
दुबई सोन्याची आहे. तिथल्या सगळ्याच गोष्टी आलिशान आणि दर्जेदार आहेत. मात्र गोरगरीबांच्या आवडत्या वडापावलाही सोन्याची झळाळी देणं म्हणजे जरा अतीच झालं. हा महागडा वडापाव खाण्यापेक्षा गड्या आपला मुंबईचा वडापावच बरा, असं कुणीही म्हणेल.