एक स्माईल दुनिया बदलू शकते, एका फ़ोटोग्राफरने 'या' 10 फ़ोटोमध्ये स्माईल कॅमेऱ्यात कैद केली आहे

एका फ़ोटोग्राफ़रने काही व्यक्तींची शक्ती ओळखली आणि त्यांची स्माईल कॅमेर्‍यामध्ये कैद केली.

Updated: Apr 22, 2021, 10:34 PM IST
 एक स्माईल दुनिया बदलू शकते, एका फ़ोटोग्राफरने 'या' 10 फ़ोटोमध्ये स्माईल कॅमेऱ्यात कैद केली आहे title=

मुंबई : कुणाच्या एका स्माईलने एखाद्याचा दिवस बनुन जातो. कधीकधी एक स्माईल दगडाचं हृद्य असणाऱ्या व्यक्तीचं हृदय नरम करतो. ते 'त्या' माणसांचं हसणं आहे. ज्यामध्ये जग बदलण्याची शक्ती आहे. एका फ़ोटोग्राफ़रने काही व्यक्तींची शक्ती ओळखली आणि त्यांची स्माईल कॅमेर्‍यामध्ये कैद केली. यानंतर अपेक्षेपेक्षा काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

१.लडाखमधील ही गोंडस मुलगी जी खुप गोड स्माईल देत आहे. उभी असलेल्या मुलीचा हा फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे

 २.फोटो गुजरातच्या काखसरचा आहे. ही मुलगी घराबाहेर मित्र-मैत्रिणीसोबत खेळत असतानाचा हा सुंदर फोटो टिपला गेला आहे.

३. हा फोटो लद्दाख जम्मू आणि काश्मीरच्या नुब्रा व्हॅलीचा आहे. हासण्यामुळे माणसाचं आयुष्य बदलतं.

४. हा फ़ोटो लद्दाख मधील एक गाव तुरतुकमधील आहे. हा फोटो बघुन कोणा- कोणाचा दिवस सुंदर जाईल?  

५.पूर्वेकडील केनिया भागांतील एमबू जवळ मुथारी ईथे अतिशय शालिनतेने हसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो काढला गेला आहे.

६. हा मूलगा पश्चिम बंगालमधील निंदोई खेड्यातील रहिवासी आहे. तो आपल्या भावासोबत शाळेतून घरी परतत होता, तेव्हाचं त्याचं हसू कॅमेऱ्यात कैद केलं आहे

७.चीनमधील फुझियानमधील फोटोग्राफरने हा फोटो काढला आहे. हसल्या नंतर लोकं किती वेगळी दिसतात.

८. वाराणसी मध्ये टिपलेला या फोटोची खरोखर काही किंमत नाही...

९.फोटो केनियाच्या नैरोबीचा आहे. फोटोमध्ये ही मुलगी खूप गोंडस दिसत आहे

१०.हा फोटो जोजावर राजस्थानचा आहे, हा फोटो पाहून तुम्ही सुद्धा या फोटोवर फिदा व्हाल