कल्याणच्या टीना जैननी पटकावले मिसेस इंडिया होममेकरचे जेतेपद

कल्याणमधल्या टीना जैन-चौधरी यांनी गुडगावमध्ये झालेल्या मिसेस इंडिया होममेकर स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. दोन मुलांची आई असलेल्या टीना यांच्यासाठी हा प्रवास निश्चितच कठीण होता....  

Updated: Nov 20, 2017, 03:56 PM IST
कल्याणच्या टीना जैननी पटकावले मिसेस इंडिया होममेकरचे जेतेपद title=

विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण : कल्याणमधल्या टीना जैन-चौधरी यांनी गुडगावमध्ये झालेल्या मिसेस इंडिया होममेकर स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. दोन मुलांची आई असलेल्या टीना यांच्यासाठी हा प्रवास निश्चितच कठीण होता....  

कल्याणमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या या टीना जैन-चौधरी.....  गुरुग्राममध्ये झालेल्या मिसेस इंडिया होम मेकर स्पर्धेत त्यांनी विजेतेपद  मिळवलंय. देशभरातल्या ४० महिलांनी य़ा स्पर्धेत भाग घेतला होता. या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेतल्या विजयामुळे पुढच्या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत टीना भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. या विजयाचं श्रेय टिना कुटुंबीयांना देते 

टीना ही मूळची जैन कुटुंबातली. तिनं संकेत चौधरी या मराठी तरुणाशी लग्न केलं. ती दोन मुलांची आई आहे. टीना इंजिनिअर आहे आणि सध्या इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करते. टीनाच्या या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. जैन धर्मीयांवर अजूनही चालीरितींचा पगडा आहे. अशा परिस्थितीत जैन धर्मातलीच एखादी महिला सौंदर्य स्पर्धेची विजेती होणं, ही तशी सोपी गोष्ट नाही. पण टीनाच्या आई वडिलांनी तिला भक्कम पाठिंबा दिला. 

या स्पर्धेसाठी टीनानं मेहनत तर केलीच, पण यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तो आत्मविश्वास, असं ती आवर्जून सांगते. आता याच आत्मविश्वासाच्या जोरावर ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.