मुलगा असो वा मुलगी, विवाहाचे वय 21 असावे? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

देशात विवाह संस्थेला अनन्य महत्वाचे स्थान आहे. मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नाचे वय (Marriage Age) किती असावे, (Marriage Age for Girls and Boys) यावर मोठी चर्चा होत आहे. 

Updated: Feb 3, 2021, 08:05 PM IST
मुलगा असो वा मुलगी, विवाहाचे वय 21 असावे? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस  title=

नवी दिल्ली : देशात विवाह संस्थेला अनन्य महत्वाचे स्थान आहे. मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नाचे वय (Marriage Age) किती असावे, (Marriage Age for Girls and Boys) यावर मोठी चर्चा होत आहे. सुरुवातीला लग्नाचे वय कमी करण्याची सूचना आली होती. त्यानुसार हे वय 14 ते 16 दरम्यान, असावे अशी मागणी होती. मात्र, आता मुलगा आणि मुलीचे विवाहाचे वय हे 21 असावे, अशी मागणी होती आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे. ( (Supreme court noticed Central Government) या याचिकेवर आता पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

देशात सर्व धर्माच्या मुला-मुलींच्या विवाहासाठी वयाची अट कमीत कमी 21 वर्षांची करावी, अशी मागणी एका करण्यात आली आहे. याप्रकरणी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात  आली आहे. त्यानंतर केंद्र सरकारला नोटीस पाठविण्यात आली आहे. आता केंद्र सरकार काय उत्तर देणार याचीच उत्सुकता आहे.

मुलगा आणि मुलगी यांच्या विवाहाचे वय काय असावे, याबाबत भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय यांनी आपले म्हणणे मांडले आहे. मुलाचे वय 21 वर्षे आहे. आता मुलीचेही वय 21 वर्षे करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. गीता लूथरा या सर्वोच्च न्यायालयात अश्विनी उपाध्याय यांच्या बाजूने युक्तीवाद करत आहेत. या याचिकेवर युक्तीवाद सुरु असताना याप्रकरणाशी संबंधित दोन याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांना विशेष अधिकाराने सर्वोच्च न्यायालयात वर्ग करता येऊ शकते, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गीता लूथरा यांची बाजू ऐकली आहे. वकील गीता लूथरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत राजस्थान आणि दिल्ली उच्च न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सध्या देशात मुलीच्या लग्नाचे वय हे 18 वर्षे असावे, अशी अट आहे. तर मुलाचे वय 21 वर्षे आहे.