मुंबई : हा मुंबईतला नंबर एक वडा पाव आहे, ज्यांनी दादरच्या किर्ती कॉलेजजवळचा वडापाव खाल्ला असेल त्यांचं याबाबतीत दुमत होऊच शकत नाही.
कारण वडापाव आणि तिखट चटणी म्हणजेच वडापाव असं समजलं जातं, पण या वडापावमध्ये नुसतीच तिखट चटणी नसते, तर सोबतीला गोड चटणी आणि भजीचा चुरा देखील असतो, यामुळे या वडापावची चव काही अनोखी असते.
हा वडापाव जवळचे ऑफिसमध्ये पार्टी सेलिब्रेशनसाठी मागवतात, यासाठी आपल्याला या ठिकाणी कुणाला तरी पाठवावं लागतं, आणि पार्सल आणावं लागतं, मोठ्या प्रमाणात ऑफिसमध्ये पार्टी म्हणून किर्तीचा अर्थात अशोकचा वडापाव दिला जातो.
अनेकांचं असं मत आहे की, मुंबईत तुम्ही अनेक वडापाव खाऊन पाहिले असतील, पण किर्ती कॉलेजजवळचा हा अशोकचा वडापाव मुंबईतला नंबर एक वडापाव आहे. व्हिडीओत पाहा हा वडापाव कसा बनवता आणि पत्ता काय आहे.