नवी दिल्ली : साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इन्फोसिसच्या सुधा मूर्ती. सुधा मूर्ती सध्या चर्चेत असण्याचं काऱण म्हणजे त्यांनी चक्क साडी खरेदीचा त्याग केलाय. गेल्या 21 वर्षांत त्यांनी एकही नवी साडी विकत घेतली नाही.
सुधा मूर्ती 21 वर्षांपूर्वी काशीला गेल्या होत्या. काशीला गेल्यावर आपल्याला प्रिय असलेल्या एखाद्या वस्तूचा, पदार्थाचा त्याग करायचा असतो, असं म्हणतात.... सुधा मूर्तींना साड्या अतिशय प्रिय आहेत.... पण काशीला गेल्यावर सुधा मूर्तींनी साडी खरेदीचा त्याग केला. त्यानंतर त्यांनी गेल्या 21 वर्षांत एकही साडी खरेदी केली नाही.
साडी खरेदीचा त्याग केल्यावर अतिशय हलकं वाटल्याची प्रतिक्रिया सुधा मूर्ती यांनी दिली. सुधा मूर्तींनी नुकतीच पीटीआयला मुलाखत दिलीय. त्यामध्ये त्यांनी हे उघड केलंय. सुधा मूर्ती यांच्या साड्या अतिशय साध्या असतात... आणि साडी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय.... सुधा मूर्तींसाठी नारायण मूर्ती खास पुण्यातून साड्या आणायचे, असंही त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय.