काय ही वेळ आली, या ‘सौंदर्यवती’च्या देशात चक्क महिला पैशासाठी विकतायत त्यांचे केस

जगाला सर्वाधिक ‘सौंदर्यवती’ देणाऱ्या देशावर अशी वेळ आली आहे की, महिलांना त्यांचे केस पैशासाठी विकावे लागत आहेत.  

Updated: May 5, 2019, 11:42 AM IST
काय ही वेळ आली, या ‘सौंदर्यवती’च्या  देशात चक्क महिला पैशासाठी विकतायत त्यांचे केस title=

करॅकस​ : केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचे एक प्रतिक. स्त्रियांचे सौंदर्य हे केसामुळे अधिक खुलते. मात्र, जगाला सर्वाधिक ‘सौंदर्यवती’ देणाऱ्या देशावर अशी वेळ आली आहे की, महिलांना त्यांचे केस पैशासाठी विकावे लागत आहेत. कारण देशावर आर्थिक संकट आले आहे. पैशासाठी अनेक महिलांना टोकाचे पाऊल उचलत स्वत:चे केस विकत आहेत

व्हेनेझुएला देश. या देशाने जगाला सर्वाधिक सौंदर्यवती दिल्या आहेत.  मात्र, पैशासाठी सौंदर्यवतींच्या देशातील महिला केस विकत आहेत. सर्वाधिक ‘मिस वर्ल्ड’ ‘मिस युनिव्हर्स’ हा पुरस्कार पटकावणाऱ्या या देशातील महिला आता पैशांसाठी त्यांचे केस देखील विकू लागल्या आहेत. कारण घर  चालविण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलेले आहे. महिला त्यांचे केस विकून ते घर चालवत आहेत. व्हेनेझुएलाने आतापर्यंत जगाला सहा मिस वर्ल्ड तर सात मिस युनिव्हर्स दिल्या आहेत. अशा सौंदर्याची खाण असलेल्या देशातील महिलांना रोजीरोटीसाठी त्यांचे केस विकण्याची वेळ आली आहेत. 

व्हेनेझुएलाचे आर्थिक संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. याचा त्रास येथील महिलांना होताना दिसत आहे. इच्छा नसताना अनेत महिला या देहविक्रीच्या व्यवसायात दाखल झाल्यात. आर्थिक संकटामुळे व्हेनझुएलातील ब्युटी पार्लर ओस पडू लागली होती. मात्र, आता या पार्लरमध्ये पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. मात्र, ही गर्दी चिंता वाढविणारी आहे. कारण महिला त्यांचे केस विकायला येऊ लागल्या आहेत. मानवी केसांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने या महिलांना केसाच्या बदल्यात १००  डॉलर्स दिले जातात.