अहमदाबाद : गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यातील मोलासा येथील नीलांशी पटेल हिचे नाव लांब केसामुळे गिनीज बुकमध्ये समाविष्ट केले गेले आहे. अकारावीत शिकणाऱ्या नीलांशीने जगातील सर्वात लांब केस असल्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. नीलांशी हिच्या केसाची लांबी ही पाच फूट सात इंच इतकी आहे. लांब केसासाठी नीलांशीला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इटलीच्या रोममधील गिनीज बुक जजने नीलांशीचा गौरव केलाय.
माझ्या केसांची निघा ही आईच करते. मला माझ्या केसांबद्दल खूप अभिमान आहे. भारतीय संस्कृतीत महिलांच्या केसांना महत्वाचे स्थान आहे. मी माझी संस्कृती जपली आहे. केसांची मला समस्या नाही. तर सुंदरतेत केसामुळे भर पडते. त्यामुळे याचा अभिमान वाटतो. तसेच जगात माझे केस लांब असल्याचा गर्व वाटत आहेत. कारण मला तसे प्रमाणपत्र मिळाले आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेय. त्यामुळे मी खूपच आनंदी आहे, असे नीलांशी सांगताना केसांबद्दल भरभरुन बोलते.
सहा वर्षांची असताना माझे केस कापले. मी खूप पडले. का माझे केस कापले? त्यानंतर माझ्या केसांना कोणी हात लावला नाही. माझे केस कापायचे नाही, हे मी तेव्हा सांगितले. तेव्हापासून मी केस वाढविण्यास सुरुवात केली, असे नीलांशीने सांगितले. माझे केस लांब असले तरी मी टेबल टेनिस सहज खेळते. त्याचा काहीही परिणाम होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.