मुंबई : मुंबई आणि पुणे शहरात अनेक परिवार ढेकूणपासून त्रस्त आहेत, घरात हवेशीर वातावरण नसणे, तसेच ढेकणांना पोषण वातावरण असल्याने अनेक ठिकाणी ढेकू वाढतात.
सिनेमा थिएटर, रेल्वे गाड्या, तसेच सार्वजनिक ठिकाणांवरून अनेक वेळा ढेकूण कपड्यांवर चढतात, आणि थेट आपल्या घरात प्रवेश करतात, आणि आपल्या घरातील वस्तूंवर कोपऱ्यात किंवा विविध वस्तूंवर ते घर करतात.
यानंतर ढेकूण एवढे वाढतात की, तुमची झोप उडवतात, ढेकूण मोठ्या प्रमाणात मानवाचं रक्त पितात, यामुळे सकाळी सकाळी मळमळ होते, सतत पायांना किंवा हातांना खाज आल्याने, त्वचेचे रोगही बळावतात. मात्र ढेकणांचं नियंत्रण करण्याचं ठरवलं, तर महाग उपाय आहेत, यापेक्षाही ते आपल्या आरोग्याला जास्त हानीकारक आहे.
ढेकूण नियंत्रण करणाऱ्या कंपन्या स्क्वेअर फूटने दर आकारतात, दोन वेळेस फवारण्या करतात, यात दोन वेळेस सामानाची साफसफाई आणि अधिक पैसे आलेच. यातही ढेकणांचं औषध फवारल्यानंतर, श्वास घेण्यास त्रास होतो, श्वसनाचा विकार असलेल्यांचा त्रास वाढतो, डॉक्टरचा खर्च आलाच.
मात्र ढेकूण नियंत्रण करण्यासाठी एक साधा सोपा उपाय आहे, तो तुम्ही थोडी सावधानता ठेवून आणि विश्वास ठेवू केला, तर निश्चित नियंत्रणात येईल. ढेकूण तुम्हाला आठ दिवसांच्या आत दिसेनासे होतील.
पाण्याची खाली बाटली घ्या, त्यात रॉकेल भरा, या बाटलीला बसणारा साधा स्प्रे विकत घ्या, तो व्यवस्थित लावा, त्याचा स्ट्रोक असा ठेवा, ज्यामुळे तुम्हाला भिंतीवरही लांबपर्यंत स्प्रे करता येईल. २० ते २५ रूपयांना मिळणारा हा स्प्रे असतो, वर फोटोत दाखवल्याप्रमाणे.
यानंतर घरात नेमके कुठे कुठे ठेकूण झाले आहेत, लपले आहेत, हे नीट निरीक्षण करून पाहा. यात रॉकेल हे स्प्रेने स्प्रे करणे महत्वाचे आहे, स्प्रे नसेल तर सर्व गणित चुकेल आणि उपयोग होणार नाही, हे लक्षात ठेवा.
भरपूर रॉकेल फवारा, खात्री होईपर्यंत फवारा, अनेक वेळा, भिंतीवरून सामानातून, अंथरूण, गाद्यांचे कोपरे यातून रॉकेल खाली येतं. गाद्या आणि पलंगाचे, खुर्च्यांचे कोपरे यात अधिक ढेकूण असतात. म्हणून या ठिकाणी हात आखडता घेऊ नका. डोळ्यात रॉकेल जाणार नाही याची काळजी घ्या.
रॉकेलने स्प्रे करण्यापूर्वी हे लक्षात घ्या, ज्वलनशील काडी पेटी, लायटर घरात ठेवू नका, मेन इलेक्ट्रीक स्वीच बंद करा. यानंतर सर्व ढेकणांच्या जागेचा वेध घेत फवारा. भितींवरील संशयित सामानाची एकही जागा सोडू नका, कोपऱ्यात जिथे जास्त ढेकूण आहेत तेथे फवारा.
स्प्रे वापरल्याने रॉकेल जास्त वेळ पुरतं, साधारण १ लीटर रॉकेलमध्ये, २०० स्क्वेअरफूट फवारणी होते. त्याप्रमाणे फवारणी करा, यानंतर तासभर घर बंद करा. रॉकेलचा वास साधारण ३ दिवस येत राहिल, यानंतर भितींवरून, सामानातून खाली पडलेले ढेकूण तुम्हाला दिसतील, २ ते ३ दिवस जिवंत ढेकूणही दिसतील, पण चिंता करू नका, पुढील १५ दिवसात ते देखील दिसणार नाहीत.
आणि यानंतर पुढील १५ दिवसातही तुम्ही अशीच स्वस्त आणि साधी सोपी फवारणी केली, तर तुम्हाला एकही ढेकूण दिसणार नाही, वर्षभरातून एकदा तुम्ही अशी फवारणी केली तर, तुम्हाला तुमच्या घरात कधीच ढेकून दिसणार नाहीत, फक्त फवारणी करताना आग लागणार नाही, याची काळजी घ्या. अनेकांना यावर विश्वास बसत नाही, पण हे एकदा करून पाहाच.