Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11, तर देशातील 12 राज्यातील 94 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होतेय. महाराष्ट्रातील ज्या 11 मतदारसंघात मतदान होणाराय, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. याठिकाणी पवार, नारायण राणे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
7 May 2024, 07:23 वाजता
Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: रोहित पवारांकडून बारामतीत मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप
बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय. इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी विरोधकांवर केलाय. पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचाही आरोप रोहित पवारांनी केलाय.
7 May 2024, 07:19 वाजता
Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: पंतप्रधानांकडून मतदारांना मायबोली मराठीतून आवाहन
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी 'आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन करतो. त्यांच्या सक्रीय सहभागामुळे निवडणूका अधिक चैतन्यमयी होतील.' असं म्हणत मतदारांना साद दिली.
आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन करतो. त्यांच्या सक्रीय सहभागामुळे निवडणूका अधिक चैतन्यमयी होतील.
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2024
7 May 2024, 07:18 वाजता
Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: 1 हजार 352 उमेदवार मैदानात
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 1 हजार 352 उमेदवार मैदानात आहेत. यातील 1229 उमेदवार पुरूष, 123 महिला उमेदवार मैदानात आहेत.
7 May 2024, 07:14 वाजता
Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: माढ्यात मतदानाची सुरुवात
43 माढा लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होतंय. 32 उमेदरावकर रिंगणात. 19 लाखांहून अधिक मतदार इथं मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 हजारहून अधिक मतदान अधिकारी इथं नागरिकांच्या सेवेत असणार आहेत.