Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11, तर देशातील 12 राज्यातील 94 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होतेय. महाराष्ट्रातील ज्या 11 मतदारसंघात मतदान होणाराय, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. याठिकाणी पवार, नारायण राणे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
7 May 2024, 14:03 वाजता
बंगालमध्ये मतदारांचा उत्साह, महाराष्ट्रात वेग मंदावला
लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून 11 राज्यांमध्ये 93 जागांवर मतदान सुरु आहे. आज भाजपच्या अनेक दिग्गजांच्या जागांवर मतदान होतंय. शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, मनसुख मांडवीय आणि नारायण राणे यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये अडतंय, तर विरोधी पक्षातील दिग्विजय सिंह, डिंपल यादव, सुप्रिया सुळे यांची विश्वासार्हता पणाला लागलीय.
7 May 2024, 13:49 वाजता
महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.55 टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. कोल्हापुरात सर्वाधिक तर माढामध्ये सर्वात कमी मतदान झालंय.
राज्यात एकूण टक्के 31.55 टक्के मतदान
लातूर – 32.71 टक्के
सांगली – 29.65 टक्के
बारामती – 27.55 टक्के
हातकणंगले – 36.17 टक्के
कोल्हापूर – 38.42 टक्के
माढा – 26.61 टक्के
धाराशिव – 30.54 टक्के
रायगड – 31.34 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 33.19 टक्के
सातारा – 32.78 टक्के
सोलापूर – 29.32 टक्के
7 May 2024, 13:23 वाजता
सुप्रिया सुळेंची ही भावनिक खेळी - फडणवीस
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची आई आशाकाकींची भेट घेतल्यावरून फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय...सुप्रिया सुळेंची ही भावनिक खेळी असल्याचं फडणवीसांनी म्हणलंय...सुळे-अजित पवार हे शत्रू नाहीत ते भाऊ-बहीण आहेत...त्यामुळे त्यांची भेट कशासाठी होती हे कळेलच अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलीय...
7 May 2024, 13:12 वाजता
धैर्यशील माने, सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते भिडले
हातकणंगलेमधून मोठी बातमी समोर येतेय.... महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले... वाळवा तालुक्यातल्या साखराळे गावातल्या मतदान केंद्रावर हा राडा झालाय.. मतदान केंद्र क्रमांकं 62 आणि 63 वरच्या सत्यजीत पाटील यांच्या बोगस प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती.. या तक्रारीनंतर मतदान केंद्र काही काळासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. यावरुन सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जाब विचारण्यासाठी आले.. तेव्हा दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं...
7 May 2024, 13:09 वाजता
निवडणूक ड्युटीवर असताना 2 सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू
कर्नाटकात निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यातील एक कर्मचारी शिक्षण विभागात, तर दुसरा कर्मचारी कृषी विभागात सहायक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होता.
7 May 2024, 13:01 वाजता
असंविधानिक भाषा भरणेंनी वापरली - रोहित पवार
रोहित पवार यांनी भरणे यांच्यावर टिका केली. असंविधानिक भाषा ही भरणेंनी वापरली असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. तर आत्या सुप्रिया सुळे यांनी संस्कृती जपली, अस म्हणत अजित पवारांच्या घरी जाऊन मोठ्यांचा आशीर्वाद घेतला असं ते म्हणाले.
7 May 2024, 12:44 वाजता
Lok Sabha Election 2024: Narayan Rane | मतदान केल्यानंतर नारायण राणेंनी केला हा विश्वास व्यक्त
Lok Sabha Election 2024: Narayan Rane | मतदान केल्यानंतर नारायण राणेंनी केला हा विश्वास व्यक्त#narayanrane #loksabhaelection2024 #vinayakraut #maharashtrapolitics #zee24taas pic.twitter.com/JaHmuhJFFl
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 7, 2024
7 May 2024, 12:29 वाजता
ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह दिसत नसल्याने आजोबा संतापले
पुण्याच्या धायरीच्या काका चव्हाण शाळेतल्या मतदान केंद्रावर मतदानाला गेलेले आजोबा चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी घड्याळ चिन्हावर महायुतीचा उमेदवार आहे. मात्र कमळ चिन्ह मतदान यंत्रावर दिसत नव्हतं. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा मात्र संताप पाहायला मिळालाय. यावेळी एक आजोबांनी संताप व्यक्त केला.
7 May 2024, 12:12 वाजता
देशात 11 वाजेपर्यतत २५.४१ टक्के मतदान झालं आहे.
पश्चिम बंगालमद्ये सर्वाधिक मतदान - ३२.८२
महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान १८.१८ टक्के
7 May 2024, 11:59 वाजता
सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट
खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आई आशा पवार यांची काटेवाडीतील पवार फार्मवर जाऊन भेट घेतली. आपण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काकीकडे जाऊन राहायचो, त्यांनी बनवलेले लाडू खूप आवडतात. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.