पुणे : "जिथे साधेपणा, चांगुलपणा आणि सत्य नाही, तिथे मोठेपणा नाही" या महान विचारवंत लियो टॉल्स्टॉय यांच्या विचारांचा आशय सार्थ ठरवत MPSC मधून एकापेक्षा अधिक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी यापैकी एकच पद निवडून बाकीच्या पदांसाठी Opt Out करून सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधील इतर गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना दिलेल्या निवडीच्या संधीबद्दल, सकल MPSC विद्यार्थांच्या वतीने आणि MPSC Made Simple चे प्रमुख ॲड. डॉ. अजित काकडे यांच्या पुढाकाराने अशा आदर्श विद्यार्थ्यांसाठी "सन्मान संवेदनशील गुणवंतांचा - सोहळा कृतज्ञतेचा" या अभिनव सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी केसरी वाडा येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लोहपुरुष स्पर्धा विजेता डॉ. राहुल र.पाटील (I.R.A.S), श्री. प्रसाद चौघुले उपजिल्हाधिकारी पुणे (राज्यसेवा २०१९ मधे महाराष्ट्रात प्रथम), श्री. गोविंद दिगंबर काकडे (API मुंबई पोलीस) इ. मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात MPSC Made Simple चे प्रमुख डॉ.अजित दिगंबर काकडे यांच्या प्रास्ताविकाने करण्यात आली. त्यांनी Opt Out बद्दलचे महत्त्व सांगत Mpsc चे या process साठी आभार मानले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते MPSC मधून निवड झालेल्या आणि Opt out करणाऱ्या 47 संवेदनशील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
सर्वांनी जागेवर उभे राहून 5 मिनिट टाळ्या वाजवत संवेदनशील अधिकाऱ्यांचे आभार मानले. यानंतर निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अनुभव कथन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अनिता काकडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी 320 विद्यार्थी उपस्थित होते.
"कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करावी " या म्हणीचा आशय सार्थ ठरवत Opt out करणाऱ्या संवेदनशील मनांचा यथोचित मानसन्मान करून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील असा अभिनव उपक्रम प्रथमच राबवून, विद्यार्थी-हितकारक पायंडा पाडल्याबद्दल MPSC Made Simple चे प्रमुख डॉ. अजित काकडे सर यांचे सर्व स्पर्धा परीक्षा वर्गातून कौतुक होत आहे.