Kerala Floods: केरळसाठी पुण्यातून रेल्वेने जाणार प्यायचं पाणी

महाराष्ट्रातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी पाठवले जाणार आहे. 

Updated: Aug 18, 2018, 02:20 PM IST
 Kerala Floods: केरळसाठी पुण्यातून रेल्वेने जाणार प्यायचं पाणी title=

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गेल्या १०० वर्षांतील सर्वात भीषण महापूर असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे केरळमधील जनजीवन ठप्प झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे सार्वजनिक सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. अनेक लोक पाण्याचा वेढा पडल्याने अडकून पडले आहेत. 
 
 केरळमधील पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्रातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी पाठवले जाणार आहे. 
 
 तसेच गुजरातमधील रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी पुण्यातून केरळला होणार आहे.  पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्यात येत आहे. रतलामहून पाणी पुण्यात पोहचल्यानंतर शनिवारी दुपारी ही रेल्वे केरळच्या दिशेने रवाना होईल.