लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा मृत्यू

घोरपडे पेठेतील झोरा कॉप्म्लेक्समध्ये नशराची आजी राहते.

Updated: Oct 21, 2018, 02:27 PM IST
लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा मृत्यू title=

पुणे: पुण्यात लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नशरा रेहमान खान असे मृत्युमुखी पडलेल्या पाच वर्षीय मुलीचे नाव आहे. पुण्यातील घोरपडे पेठेत हा अपघात घडला. खेळताना नशरा लिफ्टमध्ये अडकून गंभीर जखमी झाली. तिला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यानंतर नशराला खाजगी रुग्णलयात तिला उचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

घोरपडे पेठेतील झोरा कॉप्म्लेक्समध्ये नशराची आजी राहते. शनिवारी  नशरा आई वडिलांसह आजीकडे आली होती. त्यावेळी खेळताना ती लिफ्टमध्ये गेली. लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावर ती भिंतीमध्ये अडकून गंभीर जखमी झाली. 

दरम्यान, नशरा दिसत नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. त्यावेळी नशरा लिफ्टमध्ये अडकली असल्याचे सोसायटीतील लोकांना आढळून आले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी नशरला बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.