पुणे : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नशरा रेहमान खान असे या मृत्युमुखी पडलेल्या पाच वर्षीय मुलीचं नाव आहे. पुण्यातील घोरपडे पेठेत ही घटना घडली आहे. खेळत असताना नशरा लिफ्टमध्ये अडकून गंभीर जखमी झाली. तिला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर खाजगी रुग्णलयात तिला उचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
नशराचा उचारादरम्यान मृत्यू झाला. घोरपडे पेठेतील झोरा कॉप्म्लेक्समध्ये नशराची आजी राहते. शनिवारी नशरा आई वडिलांसह आजीकडे आली होती. त्यावेळी खेळताना ती लिफ्टमध्ये गेली. लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावर ती भिंतीमध्ये अडकून गंभीर जखमी झाली.
दरम्यान नशरा दिसत नसल्यामुळं कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. त्यावेळी नशरालिफ्ट मध्ये अडकली असल्याचं सोसायटीतील लोकांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी नशरला बाहेर काढले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.