"उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याने ते बाप चोरल्याची भाषा करत आहेत"

दसरा मेळाव्यातील भाषणावरून उद्धव ठाकरेंवर जहरी टीका 

Updated: Oct 6, 2022, 05:41 PM IST
"उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याने ते बाप चोरल्याची भाषा करत आहेत" title=

अमरावती : मुंबईमध्ये विजयादशमीला शिंदे गट आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं, तोडीस तोड भाषणे पाहायला मिळालीत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या भाषणामध्ये काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भाषणावर बोलताना खासदार नवनीत राणा (MP Navneet  Rana) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. (Navneet Rana On Uddhav Thackeray Dasara Melava 2022 marathi News)

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांचे नाहीतर फक्त प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात. उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे ते बाप चोरल्याची भाषा वापरत आहेत. शिंदेंनी त्यांच्या भाषणामध्ये बाळासाहेबांचे विचार मांडले तेच बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेऊ शकतात, असं म्हणत नवनीत राणा यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

 

उद्धव ठाकरे त्यांच्या सभेमध्ये फक्त फिल्ममधील डायलॉग मारत होते. अडीच वर्ष ठाकरे घरात बसले आणि फक्त फेसबुक लाईव्ह केलं. खरे शिवसैनिक हे एकनाथ शिंदेसोबत आहेत कारण बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम शिंदे करत असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. 

दरम्यान, राणांनी थेट उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचं म्हटल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरेंकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.