शंभर कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत- फडणवीस

निवडणूक लढण्यात मजाच उरलेली नाही.

Updated: Oct 13, 2019, 11:58 AM IST
शंभर कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत- फडणवीस title=

नागपूर: शंभर कोल्हे एकत्र आले तर सिंहाची शिकार करू शकणार नाहीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शनिवारी नागपूरमधील  प्रचारसभेत बोलत होते. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी प्रथमच स्वत:च्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. 

विरोधकांनी आमच्याविरोधात चांगले पैलवान मैदानात उतरवयाला पाहिजे होते. गडकरी आणि माझ्याविरोधात पळपुट्या लोकांना उभे केले आहे. त्यामुळे निवडणूक लढण्यात मजाच उरलेली नाही. हे लोक निवडणूक लढवण्याऐवजी केवळ आरोप करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे कोणीतरी यांना समजावून सांगितले पाहिजे की, १०० कोल्ह्यांची फौज एकत्र आली तरी सिंहाची शिकार करू शकत नाही. 

मुंबईत राहुल गांधींच्या प्रचारसभांचा फायदा होण्याची शक्यता कमीच

यावेळी फडणवीस यांनी भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामांचा पाढा वाचला. राज्यातील शेतकऱ्यांना देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी भाजप-शिवसेना सरकारने दिली. तसेच सरकारने दुष्काळ, बोंडअळी अनुदान यासारख्या योजनाही राबवल्या. एवढेच नव्हे तर पाच वर्षांमध्ये ५० हजार कोटींची विकासकामे झाल्याचा दावाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

'मोदींना नवस बोलला तर आता मुलंदेखील होतील'