बारगर्लसाठी लिंगबदलाची शस्त्रक्रिया; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

'डान्सबारमध्ये बारगर्ल म्हणून काम करायचे असेल तर आपल्याला मुलगी झाले पाहिजे'

Updated: Sep 25, 2018, 08:40 AM IST
बारगर्लसाठी लिंगबदलाची शस्त्रक्रिया; पोलिसांनी ठोकल्या बेड्या title=

नागपूर: डान्स बारमधील चकचकीत वातावरणाला भुलून नागपुरमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाने चक्रावून टाकणारे पाऊल उचलल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या मुलाची मावशी मुंबईतील एका डान्स बारमध्ये काम करते. हा मुलगा अनेकदा तिच्यासोबत डान्सबारमध्ये गेला होता. यादरम्यान त्याला या चकचकीत वातावरणाची भुरळ पडली आणि त्याने एक शॉटकर्ट मारायचा ठरवला.

डान्सबारची भुरळ का पडली?

देहभान हरपायला लावणारी मोठ्या आवाजातील गाणी, दारुचे फेसाळणारे ग्लास आणि बारबालांवर उधळले जाणारे पैसे या वातावरणाला हा तरुण अक्षरश: भुलला. आपणही मावशीसारखेच डान्स बारमध्ये नाचून सोप्या मार्गाने पैसे कमावू शकतो, असे या तरुणाला वाटले. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी या अल्पवयीन मुलानं एक योजना आखली. 

काय होती योजना?

डान्सबारमध्ये बारगर्ल म्हणून काम करायचे असेल तर आपल्याला मुलगी झाले पाहिजे, या कल्पनेने त्याच्या मनात घर केले. त्यासाठी त्यानं लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन घ्यायचे ठरवले. त्याने हा बेत आपली मैत्रीण रेहाना हिला सांगितला. 

पुढे काय झाले?

या मुलानं मोठ्या विश्वासाने ही योजना रेहानला सांगितली. मात्र, तिने या मुलाला लुबाडायचं ठरवलं. मी तुझी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन देते, असे सांगून रेहानाने तरुणाला पैसे आणायला सांगितले. हे पैसे मिळवण्यासाठी तरुणाने मावशी, मामा आणि इतर नातेवाईकांकडचे तब्बल ५० तोळे सोने चोरले. यानंतर तो घरातून पसार झाला. हे पैसे त्याने रेहानाला दिले. मात्र, रेहानाने मुलावर कोणतीही शस्त्रक्रिया न करून देता त्याच्या पैशांवर मजा मारत राहिली. अखेर नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित तरुण, रेहाना आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक केली.