सावधान | बिबट्याला दगड मारणाऱ्या लोकांवर होणार कठोर कारवाई

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही ते पवणारखारी रस्त्याच्या कडेला झाडावर असलेल्या बिबट्याला काही नागरिकांनी दगड मारले होते, 

Updated: Aug 12, 2021, 11:38 AM IST
सावधान | बिबट्याला दगड मारणाऱ्या लोकांवर होणार कठोर कारवाई title=

भंडारा :  भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही ते पवणारखारी रस्त्याच्या कडेला झाडावर असलेल्या बिबट्याला काही नागरिकांनी दगड मारले होते,  या प्रकरणात आता वनविभागाने चौकशीचे आदेश दिले आहे.

भंडारा जिल्हा हा जंगलांनी व्यापलेला आहे.  भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र हा सातपुडा पर्वत रांगाने व्यालेला आहे. या ठिकाणी घनदाट जंगल आहे. तर जंगलात वाघ, बिबट, असे अनुसूचित एक यादीतील प्राणी आहे. अनेकदा हे प्राणी मानसांच्या निदर्शनास पडतात.

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच वायरल झाला आहे. गोबरवाही ते पवणारखारी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर दोन बिबट चढले होते. त्यांना पाहण्यासाठी काही नागरिक थांबले व त्यांनी आपल्या मोबाईल कमेरात चित्रीकरण सुद्धा केले. पण या व्हिडिओमध्ये एक नागरिक बिबट्याला दगड मारताना दिसत असल्याने आता वन्यप्रेमी आक्रमक झाले आहेत.

बिबट्याला दगड मारल्याची तक्रार वनप्रेमींनी वनविभागाकडे केली आहे. आता या तक्रारीवरून वनविभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तर वनविभागाने चौकशी सुरू केली असून चौकशी झाल्यावर जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले आहे.