सायरन वाजवत स्मशानाकडे निघाल्या १५ ते २० रुग्णवाहिका; नागरिकांचा थरकाप आणि चर्चांना उत

एक रुग्णवाहिका तुफान वेगात सायरन वाजवत आली तर, आपल्या काळजाचा ठोका चुकतो. इथे 1-2 नाही तब्बल 20 रुग्णवाहिका एका पाठोपाठ एक स्मशानाकडे धावल्या.

Updated: May 19, 2021, 08:16 PM IST
सायरन वाजवत स्मशानाकडे निघाल्या १५ ते २० रुग्णवाहिका; नागरिकांचा थरकाप आणि चर्चांना उत title=

अनिरुद्ध दवाले, अमरावती : एकाच वेळी 15 ते 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे सायरन वाजवत निघाल्याने अमरावतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. अमरावती शहरातील एका रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या सहकारी रुग्णवाहिका चालकांनी 15 ते 20 रुग्णवाहिका त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी केल्या. एकावेळी 15 ते 20 रुग्णवाहिका सायरन वाजवत गेल्यामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. तसेच शहरात वेगवेगळ्या चर्चांना उत आला.

मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना जवळपास १५ ते २० रुग्णवाहिका अंत्ययात्रेत सामील करून आपल्या सहकाऱ्याला अंतिम विदाई देत श्रद्धांजली दिली. मात्र अशा प्रकारे सायरन वाजवत निघालेल्या या रुग्णवाहिका पाहून शहरातील नागरिकांना चांगलीच धडकी भरली आणि वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला. एकाच वेळी इतके मृतदेह अंतिम संस्कारासाठी आले कि काय ? या विचाराने प्रत्येक जण घाबरून गेल्याच चित्र स्मशानभूमी परिसरात पाहायला मिळालं.

संजय किसनराव कुणते (वय 50) या खाजगी संस्थेच्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे बुधवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाली असताना त्याच्या सहकारी रुग्णवाहिका चालकांनी त्यांच्या अंत्ययात्रेत रुग्णवाहिका नेऊन सहभाग घेतला. आपल्या सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना अनेक रुग्णवाहिका चलक सायरन वाजवत निघाल्याने अमरावतीकरांमध्ये दहशत निर्माण झाली. अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने आज बऱ्याच रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाल्या. त्यामुळे अमरावतीकरांच्या मनात धडकी भरली. 

जिल्हा समान्य रुग्णालय येथील शव विच्छेदनगृह जवळून सायरन वाजत 15 ते 20 रुग्णवाहिका हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या. सायरनचा जोरदार आवाज करीत या रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भूतवश्वर चौक येथून हिंदू समशानभूमिकडे निघाल्या. इतक्या रुग्णवाहिका निघाल्याचे पाहून नागरिक चांगले धास्तावले. रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवणे बेकायदेशीर असताना ऐन कोरोनाकाळात सायरन वाजवत 15 ते 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाल्याने खळबळ उडाली.