'आई-वडिलांनी जन्म दिला पण ओळख साहेबांनी दिली'

आई वडिलांनी जन्म दिला पण ओळख मला शरद पवारांमुळे मिळाली अशी कबुली जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Updated: Jan 27, 2020, 01:57 PM IST
'आई-वडिलांनी जन्म दिला पण ओळख साहेबांनी दिली' title=
फाईल फोटो

ठाणे : ठाण्यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत, तसंच कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित होते. आई वडिलांनी जन्म दिला पण ओळख मला शरद पवारांमुळे मिळाली अशी कबुली जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली. 

लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. यावेळी तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल, त्यांना अशीच साथ द्या असं आवाहन शरद पवार यांनी या कार्यक्रमावेळी बोलताना केलं.

जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात, शरद पवारांनी आव्हाडांचं कौतुक करत महाराष्ट्राला कर्तुत्ववान मंत्री मिळाला असल्याचं सांगितलं. जिथे कर्तुत्व असतं, कर्तुत्वाला प्रोत्साहन कऱण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्न सोडवणारं नेतृत्व उभं राहू शकत असून हेच आव्हाडांनी महाराष्ट्राला दाखवून दिल्याचं पवार म्हणाले.  

तर आपल्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन विठ्ठल असल्याचं यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले. राज्यातल्याप्रमाणेच दिल्लीतही परिवर्तन होणार आणि त्याचे सूत्रधार हे सुद्धा शरद पवारच असतील असा दावा, संजय राऊतांनी केला. 

जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात शरद परावांसह, खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.