Mega Block News : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

Railway Megablock : मध्य रेल्वे मार्गावरील भिवपूरी रोड ते कर्जत स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल उशीराने धावतील. प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक...

Updated: Feb 15, 2023, 08:21 AM IST
Mega Block News : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!   title=
Mumbai Central Railway to operate traffic blocks

Central Railway Megabklock : लोकलचा प्रवास करण्यापूर्वी ही महत्त्वाची बातमी नक्की वाचा. कारण मध्य रेल्वेवरील (Central Railway) भिवपुरी रोड आणि कर्जत डाऊन मार्गावर मध्य रेल्वेने रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. आजपासून म्हणजेच 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान दररोज रात्री 1.50 ते 4.50 या वेळेत देखभाली आणि दुरुस्तीसाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी शेवटची कर्जत लोकल आणि कर्जत येथून सुटणारी पहिली सीएसएमटी लोकल आज, बुधवारपासून पाच दिवस रद्द राहणार आहे. 19 फेब्रुवारीच्या पहिल्या लोकलपर्यंत हा बदल असेल. 

कर्जत आणि भिवपुरी रोड या स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील रुळांमधील स्लीपर्सची दुरुस्ती आणि खडीची स्वच्छता करण्यासाठी बीएसएम मशिनच्या मदतीने काम करण्यात येणार आहे. परिणामी याकामासाठी मध्यरात्री 1.50 ते पहाटे 4.50 वाजेपर्यंत पाच दिवस ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटीहून कर्जतसाठी रात्री 12.24 वाजता सुटणारी शेवटची लोकल आणि कर्जतहून सीएसएमटीसाठी निघणारी मध्यरात्री 2.33 ची पहिली लोकल रद्द राहणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना कर्जतची शेवटची लोकल पकडून घरी जाता येणे शक्य होते. मात्र, ब्लॉकमुळे आगामी पाच दिवस लोकल रद्द राहणार असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. 

ब्लॉककाळातील वेळापत्रक

शेवटची लोकल : सीएसएमटी ते कर्जत - रात्री 11.30

पहिली लोकल : कर्जत ते सीएसएमटी - पहाटे 3.40